धक्कादायक - हॉटेलमध्ये एक व्यक्ती मृतावस्थेत

मुझफ्फरनगर (भाषा) -  उत्तर प्रदेशातील एटा जिल्ह्यातील एका हॉटेलमध्ये एक व्यक्ती रहस्यमय परिस्थितीत मृतावस्थेत आढळून आली. पोलिसांनी बुधवारी ही माहिती दिली.
[ads id="ads2"]  पोलिसांनी सांगितले की, अभय अरोरा (२५) असे मृताचे नाव आहे. पोलिसांनी सांगितले की, अरोरा काही दिवसांपूर्वी व्यवसायाशी संबंधित कामानिमित्त एटा येथे गेला होता आणि तेथील एका हॉटेलमध्ये थांबला होता.
[ads id="ads1"]  मात्र, अरोरा हॉटेलच्या खोलीतून बाहेर न आल्याने त्यांच्या चालकाने हॉटेल कर्मचारी आणि पोलिसांना याची माहिती दिली. पोलिसांनी सांगितले की, अरोरा हे हॉटेलमधील त्यांच्या खोलीच्या बाथरूममध्ये मृतावस्थेत आढळले. या प्रकरणाची पाहणी सुरू आहे.

जाहिरात

Suvidha Online Raver


 


SuvarDip News Android App
⬆️ येथे क्लिक करून Download करा ⬆️