ताडोबा अभयारण्यात वाघिणीच्या हल्ल्यात ३८ वर्षीय वनरक्षकाचा मृत्यू

चिमूर - ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पात कर्तव्य बजावत असताना स्वाती ढुमणे (वय ३८) ह्या महिला वनरक्षक म्हणून कार्यरत होत्या त्यां वाघ चिन्हे सर्वेक्षण करतेवेळी माया वाघिणीने त्यांच्या वर हल्ला चढवून जागीच ठार केले. ही थरारक घटना काल शनिवारी पहाटे ७ वाजेदरम्यान कोलारा वनपरिक्षेत्रात गेटपासून ४ कि.मी. अंतरावर घडली.
[ads id="ads2"] ही घटना पर्यटकांच्या डोळ्यांदेखत घडली ताडोबात वनविभागाच्या कर्मचाऱ्यावर पहिल्यांदाच वाघाचा असा हल्ला झाला आहे. सविस्तर वृत्त असे की स्वाती ढुमणे तीन वनमजुरांसह जंगलात वाघांचे चिन्ह सर्वेक्षण (ट्राॅन्झिट लाइन सर्व्हे) करत असतांना कक्ष क्रमांक ९७ मध्ये सुमारे २०० मीटरवर त्यांना माया वाघीण दिसली आणि वाघिणीला बघून त्यांनी आपला मार्ग बदलला. 
[ads id="ads1"] परंतु काही वेळातच अचानक वाघिणीने स्वाती यांच्यावर हल्ला चढविला व जंगलात फरपटत नेले. ही बाब कळताच वनाधिकारी व कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली आणि त्यानंतर शोध घेतला असता, स्वाती यांचा मृतदेहच शोधात आढळून आला. या घटनेनंतर लगेच सर्व्हे थांबविण्यात आला, अशी माहिती व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्र संचालक डाॅ. रामगावकर यांनी दिली. वनविभागाच्या वतीने पती संदीप सोनकांबळे यांना पाच लाख दहा हजारांची तातडीची मदत देण्यात आली. त्यांना चार वर्षांची आरुषी नावाची मुलगी आहे. स्वाती ताडोबातील पहिल्या वन शहीद ठरल्या आहेत.

जाहिरात

Suvidha Online Raver


 


SuvarDip News Android App
⬆️ येथे क्लिक करून Download करा ⬆️