रांजणगाव शे.पु येथील व्यावसायिक प्रशिक्षण केंद्र येथे संविधान दिन विविध उपक्रमाच्या माद्यमातून साजरा


औरंगाबाद प्रतिनिधी(प्रमोद धुळे)

रांजणगाव शे.पु येथील व्यावसायिक प्रशिक्षण केंद्र येथे संविधान दिन विविध उपक्रमाच्या माद्यमातून साजरा करण्यात आला.यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले प्रभाकर तुळसे साहेब सामाजिक कार्यकर्ते अभ्यासक फुले,शाहू,आंबेडकर विचारधारा यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांना संविधानाची गरज का आणि कशासाठी आहे.[ads id="ads2"]  

  याबद्दल मार्गदर्शन केले पुढे ते म्हणाले की बुद्धांनी दिलेला शिलाचा मार्ग आपण आत्मसात करून योग्य अयोग्य गोष्टीची उकल करणे गरजेचे आहे.त्यानंतर ए.एम.बेकटे यांनी आपल्या भाषणामद्ये डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी अपेक्षित असलेली संवैधानिक लोकशाही आज कमजोर होतांना दिसत आहे.[ads id="ads1"]  

  यासाठी संविधान वाचवणे गरजेचे आहे बाबासाहेबांचे विचार विद्यार्थ्यांनामद्ये रुजवणे ही काळाची गरज आहे.त्यानंतर संजय खरात आणि मनोगत व्यक्त करतांना भारतीय संविधान हे इतर देशापेक्षा किती प्रभावी आहे हे त्यांनी यावेळी सांगितले.त्यानंतर कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.प्रमोद धुळे सर यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची दूरदृष्टी आणि आजचा विद्यार्थी कसा असावा याबद्दल मार्गदर्शन केले.प्रकाश वाकळे,प्रदीप वाहुळ यांची सुद्धा यावेळी उपस्थीती होती.

  कार्यक्रमाचे सूत्रसंचलन विनोद दांडगे सर यांनी केले तर पाहुण्यांचा परिचय ज्योती दिवसे मॅडम यांनी करून दिला.कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी कान्हा गोरे,श्रद्धा निकम,महेश भगत,पल्लवी राठोड, कोमल शिंदे मॅडम,अंकिता भिसे, अपर्णा चोकटे,रनवरे मॅडम यांनी प्रयत्न केले.कार्यक्रमानंतर संविधान गौरव परीक्षेचे सुद्धा आयोजन करण्यात आले होते.परीक्षेला परिसरातून असंख्य विद्यार्थ्यांनि सहभाग नोंदवून प्रतिसाद दिला.

जाहिरात


Suvidha Online Raver


 


SuvarDip News Android App
⬆️ येथे क्लिक करून Download करा ⬆️