दुःखद : सासू-सासऱ्यांच्या जाचाला कंटाळून 32 वर्षीय युवकाने संपवली जीवन यात्रा

 

शिरसोली (जि.जळगाव) : सासू-सासऱ्यांच्या जाचाला कंटाळून एक ३२ वर्षीय युवकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना जळगाव तालुक्यातील शिरसोली येथे घडली आहे.[ads id="ads2"]  

सदर ही घटना आज रविवारी सकाळी साडेसहाच्या सुमारास उघडकीस आली आहे. अमोल प्रकाश धनगर (वय ३२ रा. अशोकनगर, शिरसोली प्र.न.) असे मयत तरुणाचे नाव असून या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान, अमोल धनगर यांच्या खिशात सुसाईड नोट आढळली आहे. तसेच आत्महत्या करण्यापूर्वी व्हॉट्सअपवर स्टेटस ठेवले होते. त्यात सासू-सासऱ्याच्या त्रासाला कंटाळून माझी जीवन यात्रा संपवीत असल्याचं म्हटलं आहे.[ads id="ads1"]  

याबाबत सविस्तर वृत्त असे की, शिरसोली येथील अशोकनगर मध्ये अमोल धनगर आपल्या पत्नी, मुले, आई-वडीलांसोबत राहत होते. ते बकरी चारण्याचा व्यवसाय करून आपल्या कुटुंबाचे उदरनिर्वाह करीत होते. शिरसोली जळके रोडवरील भोलेनाथ नगरमधील बकऱ्यांच्या शेडमध्ये दररोज रात्री अमोल झोपायला जायाचा. शनिवारी रात्री त्याने वडिल प्रकाश धनगर यांना झोपण्यासाठी पाठवले होते. तो घरी झोपला होता. रविवारी सकाळी ६:३० वाजता वडील प्रकाश धनगर घरी आले. त्यांना अमोल हा छताच्या हुकाला दोरी बांधून गळफास घेऊन आत्महत्या केली असल्याचे निदर्शनास आले.

हेही वाचा ☞ कन्नड घाटातील वसुली प्रकरणी चार पोलीस कर्मचारी निलंबीत 

यावेळी त्यांनी आरडाओरडा केला. गल्लीतील लोक धावले. पोलीस पाटील श्रीकृष्ण बारी यांनी त्यांचा मृतदेह खाली उतरवून शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केला. तेथे वैद्यकीय अधिकारी डॉ. रेणुका भंगाळे यांनी तपासून त्याला मृत घोषित केले. अमोल याच्या खिशात सुसाईड नोट आढळली आहे. यात त्याने सासु सासरे यांच्या धमक्या व छळाला कंटाळून मी जीवन यात्रा संपवत आहे, असे नमुद केले आहे. पोलीस पुढील तपास करीत आहेत. त्यांच्या पश्चात १मुलगा २ वर्षाचा वेदांत, १ मुलगी ४ वर्षाचा तेजश्री, पत्नी, वडील, भाऊ आहे. अमोलची पत्नी एक ते दीड महिन्यापासून मुलांना घेऊन माहेरी गेली आहे.


जाहिरात

Suvidha Online Raver


 


SuvarDip News Android App
⬆️ येथे क्लिक करून Download करा ⬆️