बुद्धिस्ट इंटरनॅशनल नेटवर्कचे राष्ट्रीय अधिवेशन पवनीत संपन्न

 पवनी : बुद्धकालीन वैभवसंपन्न असलेल्या पवनीनगरीत पवनीच्या इतिहासावर भाष्य करताना पुरातत्व विभागाच्या उत्खननात मिळालेल्या बौद्ध स्तुपाच्या अवशेषांचे जतन व इतिहासाचे स्मरण करण्यासाठी भारत मुक्ती मोर्चा संलग्नित बुद्धिस्ट इंटरनॅशनल नेटवर्कतर्फे तिसरे राष्ट्रीय अधिवेशन आयोजित करण्यात आले.[ads id="ads2"]  

चंद्रमणी बौद्धविहार पवनीच्या आवारात संपन्न झालेल्या अधिवेशनाच्या अध्यक्षपदी बुद्धिस्ट इंटरनॅशनल नेटवर्कचे राष्ट्रीय संरक्षक वामन मेश्राम, तर उद्घाटक म्हणून भदंत ज्ञानज्योती महाथेरो उपस्थित होते. प्रमुख पाहुणे म्हणून पुरातत्व विभागाचे अभ्यासक प्रियदर्शी खोब्रागडे, विलास खरात, डॉ. विवेक घाटे, तहसीलदार नीलिमा रंगारी, भदन्त शांतीरत्न, भदंत संघपाल, दूरदर्शन मुंबईचे असिस्टंट डायरेक्टर काशिनाथ सोनवणे उपस्थित होते. यावेळी विकास राऊत, प्रेमचंद सूर्यवंशी, शैलेश मयूर, प्रमोद घरडे, उषा इंगोले, रा. ज. चित्तूरकर, चंद्रमणी घोनमोडे, संजय वाळके, वैशाली सतदेवे, पुष्पा बौद्ध, ईश्वर मेश्राम, भन्ते सोमानंद यांचा सहभाग होता.

कार्यक्रमात पवनी येथील तीन प्राचीन बौद्ध स्तूप तसेच कुही येथील बुद्धकालीन ऍडम बुद्ध स्तुपाला भारतीय पुरातत्व विभागच नष्ट करीत असेल तर जनतेने काय करायला हवे? यावर चर्चा करण्यात आली तसेच दीक्षाभूमीवर दीक्षाभूमी मुक्ती आंदोलन सुरू करणे काळाची गरज आहे असे सांगताना तब्बल ४० वर्षे उलटूनही महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे संपूर्ण साहित्य सरकारने अजूनही प्रकाशित केले नाही. अशा विविध विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले.

जाहिरात

Suvidha Online Raver


 


SuvarDip News Android App
⬆️ येथे क्लिक करून Download करा ⬆️