[ads id="ads2"]
मिरज विशेष प्रतिनिधी (अॅड बसवराज होसगौडर)
विष्णूदास भावे यांनी १८४३ साली सीता स्वंयवर हे पहिले नाटक रंगभूमीवर सदर करून मराठी नाट्यसृष्टीचा पाया घातला. १९४३ साली या घटनेचे स्मरण म्हणून राज्यातील सर्व नाट्य कलाकार दरवर्षी ५ नोव्हेंबर हा दिवस मराठी रंग भूमीदिन म्हणून साजरा केला जातो.
[ads id="ads1"]
मिरज येथील बालगंधर्व नाट्यग्रह येथे रंगभूमी दिननिमित्त मान्यवरांच्या हस्ते नटराज पुजन करण्यात आले. या वेळी मिरज विध्यार्थी थेटर मार्फत लेखक दिलीप जगताप यांनी लिखित "आंधळा आणि पांगळा" नाटक प्रायोगिक नाट्य सादर करण्यात आले. यात सहभागी कलाकार भुमिका- संवादक सरज कांबळे, राजेश पोळ, आतिष कांबळे आणी धिरज पलसे, विशेष सहाय्य शेडबाळे (काका), या नाटकाचे दिग्दर्शन अनिकेत ढाले यांनी केली आहे. उपस्तित मान्यवर ओंकार शुक्ल, बाळासाहेब बरगाले (दादा), नामदेव भोसले , धनंजय पाठक , विनायक इंगळे, दि.गा.कुलकर्णी , ओंकार रजपूत , प्रतिक धुळूबुळू , प्रकाश अहिरे, अक्षय वाघमारे , प्रदिप शिंदे , सुरज पाटील , श्रेयस गाडगीळ, समर्थ कांबळे , प्रकाश कांबळे, धनंजय माने, धिरज पोळ, प्रदिप प्रकाश जाधव (पैलवान), अक्षय वाघमारे, विशाल कोठावळे, अविनाश शिंदे (कवि ), भीमराव धुळूबुळू( कवी ), धीरज पोळ, तुकाराम कोळी, अॅड बसवराज होसगौडर, अॅड पूजा शिंगाडे आधी कलाकार, प्रेक्षक उपस्थित होते.