शाळा सुरु करीत असतांना

    कोरोनाचा कहर अजून संपलेला नाही. त्यातच कोरोना आता पुन्हा नव्या व्हेरीयंटच्या रुपात भडकलेला आहे. त्यातच इस्रायल मध्ये त्याचा रुग्ण जरी सापडला असेल, तरी तो आपल्या देशात येणार नाही हे काही नक्की सांगता येत नाही
[ads id="ads2"]
      कोरोना आता सातव्या आसमानावर असल्यागत संपायला तयार नाही. त्यानं अख्खं जनजीवन विस्कळीत केलं आहे. त्यातच लोकांना कामधंदेही नाहीत. असं असूनही महागाई चरणसीमेवर आहे. त्यातच आता कोरोनाचा नवा व्हेरीयंट. 
           कोरोनाचा नवा व्हेरीयंट ओमीक्रान नावाने जगाला दस्तक देत असून नव्या रुपानं पाऊल पसरत आहे. त्यातच हा व्हेरीयंट जगात पाऊल पसरत असतांना भारतात कधीच येणार नाही असंही म्हणता येणे शक्य नाही. आज ओमीक्रान भारतातही येवू शकतो. त्यामुळं खबरदारी घेणं अत्यंत गरजेचं आहे.
[ads id="ads1"]
         दि. एक डिसेंबर. शासनानं पहिल्या वर्गापासून तर अगदी सातव्या वर्गापर्यंत शाळा सुरु कराव्यात असा आदेश काढला. कारण आठवीपासून शाळा सुरु झालेल्या आहेत. परंतू पहिलीच्या वर्गापासून सातवीपर्यंतच्या वर्गाची आबाळ होत असल्यानं शासन ती शाळा एक डिसेंबरपासून सुरु करणारच अशी चिन्ह दिसत आहेत. याबाबत सांगतांना एक गोष्ट नक्कीच सांगावीशी वाटते. ती म्हणजे मागील वर्षीचा इतिहास. मागील वर्षी असंच मुलांचं नुकसान होतं ही बाब लक्षात घेवून शासनानं पाचवीपासून शाळा सुरु केल्यात. त्यातच ही लहान मुलं कितीही सुचना करुनही सोशल अंतर न वापरत असल्यानं कोरोना पंधरा दिवसात अगदी जैसे थे परिस्थीतीवर पोहोचला. म्हणण्याचं तात्पर्य असं की शाळा सुरु करतांनाही उत्क्रांतीवादाचा नियम लावावा. म्हणजेच हळूहळू वर्ग सुरु करावे. याचाच अर्थ असा की सातवी नंतर आठ दिवसांनी सहावी. त्यानंतर आठ दिवसानं सहावी त्यानंतर आठ दिवसानं पाचवी. त्यातच संक्रमण होतांना दिसलं तर तोच उत्क्रांतीवादाचा नियम लावू नये. फक्त तास बदलवावेत. असं जर केलं तर आपण शाळा सुरु नक्कीच ठेवू शकतो. तसेच
 कोरोनाच्या प्रादुर्भावावर नक्कीच विजय मिळवू शकतो.
           
शाळा सुरु करणे गरजेचे आहे. परंतू शाळा सुरु करतांना काही खबरदारीही घेण्याची गरज आहे.

       १) शाळा सुरु करीत असतांना सुचना देणे गरजेचे आहे. त्या सुचना सुचनाफलकावर लावाव्यात. तसेच मोबाईलच्या माध्यमातून सूचना ह्या विद्यार्थी व पालकांपर्यंत जावू द्याव्यात. 

      २) कोरोनाची बाधा होणार नाही यासाठी प्रत्येकाला मास्क लावणे अनिवार्य करावे. 

     ३) शाळेनं वर्गखोल्या पुरेशा सानिटाईज करुन घ्याव्यात. तसेच आठ आठ दिवसांनी त्या खोल्या सानिटाईज कराव्यात.

     ४) पिण्याच्या पाण्याची व्यवस्था वेगळी असावी. सोबतच जेवन करायचं असेल तर चांगले हात धुवूनच जेवन करावे.

     ५) विद्यार्थ्यांना पुरेसं अंतर ठेवून बसायला सांगावं. तसेच भीड होणार नाही असं वर्तन शाळेत ठेवायला लावावं.

     ६) आपला रुमाल इतरांना देवू नये. नोटबूक पुस्तकेही देवू नयेत.
   
  ७)खोकतांना किंवा शिंकरतांना तोंडासमोर रुमाल धरावा. तसेच जागोजागी विद्यार्थ्यांनी थुंकू नये अशा सुचना सुचनाफलकावर लावाव्यात

        ८) एखाद्याला आजार असल्यास त्यानं शाळेत येवू नये. समजा तो विद्यार्थी शाळेत आला असल्यास त्यानं तशी सुचना ही शिक्षकांना द्यावी. शिक्षकांनीही त्याची तापमानाची तपासणी करुन तशी सुचना पालकांना द्यावी. 

   ९) शक्य झाल्यास पालकांनी आपल्या मुलांना कोरोना होवू नये म्हणून हँडग्लोज( हातमोजे) घेवून द्यावेत. 
   
  १०) विद्यार्थ्यांनी घरुन कापूर आणि हळदीच्या पुड्या सोबत ठेवाव्यात.

      ११) पालकांनी आपल्या पाल्यांच्या आजाराची टेस्टींग केल्याशिवाय शाळेत पाठवू नये. जेणेकरुन इतरांना तो आजार होणार नाही.

     १२) शाळा सुरु करतांना जसे शिक्षक सुचना देतात. तसेच त्या सुचनांचे पालनही विद्यार्थ्यांनी करणे अनिवार्य आहे. जर त्याचे पालन झाले नाही वा विद्यार्थ्यांनी केले नाही तर त्याचे संक्रमण तीव्रतेने वाढेल. 

        १३) विद्यार्थ्यांनी आपले हात डोळे, कान, नाक व तोंडाला लावू नये. त्यातच शौचाला किंवा मुत्रीघरात गेल्यास हात चांगले स्वच्छ धुवून घ्यावेत.

       १४) परीसरही चांगला स्वच्छ करुन घ्यावा. तसं आरोग्यपालिकेला कळवावे. शक्य झाल्यास परीसर सानिटाईज करुन घ्यावा.

      १५) एवढेही करुन एखाद्याला कोरोना आढळल्यास त्याची ताबडतोब टेस्टींग करण्याची व्यवस्था शाळेत बी असावी. डॉक्टरांनीही ताबडतोब सहकार्य करावे. जेणेकरुन कोरोनाचा प्रसार होणार नाही.
   
     १६) शक्य झाल्यास शाळेमध्येच कोरोना लसीकरण हा उपक्रम शासनानं राबवावा. जेणेकरुन कोरोनाला रोकता येईल.

    १७) विद्यार्थ्यांनी आपले हात साबनाने चांगले रगडून धुवावेत. हाताला सानिटायजर लावावे.

             शाळा सुरु करतांना वरील आवश्यक सुचनांचे पालन होणे गरजेचे आहे. त्या सुचनांचे पालन जर झाले तर कोरोना नक्कीच कोरोना शिवणार नाही व शाळाही व्यवस्थीत सुरु राहतील. त्यातच विद्यार्थ्यांच्या अभ्यासाचे व शिक्षणाचे नुकसान होणार नाही हे तेवढेच खरे आहे.

        अंकुश शिंगाडे नागपूर ९३७३३५९४५०

जाहिरात

Suvidha Online Raver


 


SuvarDip News Android App
⬆️ येथे क्लिक करून Download करा ⬆️