आदिवासी विकास विभाग कर्मचारी एकता मंच, यावल यांच्या वतीने आदिवासी उपयोजना क्षेत्रातील योजनांचा आढावा घेण्यासाठी नेमलेल्या प्रकल्प स्तरीय समितीचा सत्कार..

[ads id="ads2"]
मा. प्रकल्प अधिकारी सो., यावल यांचेसोबत कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांबाबत सकारात्मक चर्चा
यावल Yawal - एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय, यावल येथे आदिवासी  उपयोजना क्षेत्रातील योजनांचा आढावा घेण्यासाठी नेमलेल्या आदिवासी विकास विभागाच्या प्रकल्प स्तरीय समितीचे अध्यक्ष मा. डॉ. चंद्रकांत बारेला तसेच सदस्य मा. एम. बी. तडवी सर, मासुम तडवी, जुबेदा बाई तडवी, मा. जाफर तडवी मा.रतन भंगी यांचा 
[ads id="ads1"] आदिवासी विकास विभाग कर्म. एकता मंच चे जिल्हाध्यक्ष दस्तगीर अरमान तडवी , जिल्हा उपाध्यक्ष विजयानंद बळीराम सुरवाडे, सचिव निलेश तडवी, कार्याध्यक्ष प्रदीप बारेला यांचे हस्ते सत्कार करण्यात आला.
 तसेच या प्रसंगी मा. प्रकल्प अधिकारी सो. श्रीमती विनिता सोनवणे यांचा ही सत्कार करण्यात आला आणि कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांबाबत सकारात्मक चर्चा करून त्याबाबत लवकरच कार्यवाही करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.

जाहिरात

Suvidha Online Raver


 


SuvarDip News Android App
⬆️ येथे क्लिक करून Download करा ⬆️