कोर्टाचे चक्कर ; सामान्य माणसांनी विचार करावा

     तो न्यायालय परीसर. त्या परीसरातही त्या काळात जास्त गर्दी नव्हती. पण जसा कोरोना आटोक्यात आला, तसं न्यायालय उघडलं. मग काय न्यायालयात एवढी गर्दी गोळा व्हायला लागली की वाटलं की आज लोकांना कामधामच उरलेलं नसेल.
     कोर्टात आज वादी प्रतिवादींची संख्या फार वाढत चाललेली आहे. खटले संपायचे नाव घेत नाहीत. त्याची कारणंही बरीच असतील. पण मुख्य कारण म्हणजे लोकसंख्या. आज लोकसंख्या अफाट आहे. 
[ads id="ads2"]
त्यामानानं भांडणं होणारच. त्यातच ती भांडणं सोडविण्यासाठी पुरेसी यंत्रणा नाही. म्हणजेच न्यायाधीश नियुक्त केलेले नाही. त्यामुळं अनेक प्रतिवादींना एकच न्यायाधीश न्याय देवू शकत नाही.
          न्यायाधीश महोदयांनाही बंधन असतं. ते म्हणजे तेवढे खटले समाप्त करणे. ते तसे खटले समाप्तही करतात. पण लोकं असे असतात की विनाकारण भांडणं करुन न्यायालयात आपली प्रकरणं प्रविष्ट करीत असतात.
[ads id="ads1"]
           आज असे कितीतरी खटले न्यायालयात प्रविष्ट होत आहेत की ज्या खटल्यात प्रतिवादींचा गुन्हा नसतो. परंतू तो गुन्हा जरी नसला तरी त्याला न्यायालयात चकरा माराव्याच लागतात. त्याचं कारणंही तसंच आहे. ते कारण म्हणजे इतर कोणीही गुन्हे करु नयेत.
           गुन्हे.......गुन्हे हे सुनियोजीत असतातच असे नाही. काही गुन्हे हे अकस्मात घडून येत असतात. तर काही गुन्हे हे सुनियोजीत असतात. काही गुन्ह्यात गुन्हेगार हा आपला दबदबा निर्माण करण्यासाठी गुन्हे करीत असतो. तर काही गुन्ह्यात आपले वर्चस्व दाखविण्यासाठी. काही काही वादी तर असे असतात की ते विनाकारण कोणाच्याही वाट्याला जात असतात. त्यानंतर स्वतःच खटले दाखल करीत असतात. कारण त्यांना त्यात आनंद वाटत असतो. एक खटला ऐकून तुम्हालाही आश्चर्य वाटेल. तो खटला म्हणजे पैसे कमविण्याचा. लोकं कसकसे पैसे कमवतात ते पाहा.
             एक असाही व्यक्ती..... तो शाळेचा मुख्याध्यापक होता. त्याची पैसे कमवायची इच्छा होती. तो विचार करु लागला. पैसे कसे कमवावे. विचारांती त्याला युक्ती सुचली. ती म्हणजे आपण भांडण करावं. 
           तो सहकारी माणसाशी भांडण करु लागला. त्यातच ज्याचेशी तो भांडण करीत असे. त्याचे तो शाळेत येवूनही वेतन बंद करु लागला. 
         शाळेत येवूनही वेतन बंद होताच शाळा कर्मचारी आपला खटला न्यायालयात टाकत असे. मात्र हा खटला लढण्यासाठी तो मुख्याध्यापक शाळेतील शिक्षकांकडून मनमानी पैसा गोळा करीत असे. त्यातच तो पैसा गोळा करण्यासाठी कर्मचा-यांना त्यांचे वेतन बंद करण्याची धमकी देत असे.
          मुख्याध्यापक खटल्यासंबंधाने म्हणत असे की मी हे खटले आपणासाठीच टाकले. त्यानंतर गोळा झालेल्या पैशाचा फक्त दहा टक्के भाग हा वकीलाला देत असे. बाकी नव्वद टक्के भाग आपल्याजवळ ठेवत असे.
             पैसे कमविण्याचा हा न्यायालयीन मार्गाचा धंदा मुख्याध्यापकाचा जोरात चालला होता.,आज तो त्याच अतिरिक्त पैशाने श्रीमंत बनला होता.
          बरेचसे असेही गुंड आहेत की जे न्यायालयातून वकीलामार्फत निर्दोष सुटत असतात आणि ते निर्दोष सुटले की घराकडे चाकूच्या धाकावर खंडणी लुटत असतात. त्याला जनताही धडा शिकवू शकत नाही. कारण त्यांना भीती असते की एखाद्या वेळी हा गुंड आपल्याला मारुन टाकेल वा त्यांना पोलिसही काही करीत नाही. कारण पोलिसांना माहित असते की हा गुंड एखाद्या दिवशी आपल्यालाही ठार करेल.
           याबाबत आणखी एक गोष्ट सांगतो. एका वसतीगृहात गावोगावची मुलं राहात होती. ती मुलं सणासुदीला गावला जात. त्यातच त्या सणाच्या निमित्यानं गावला गेल्यावर ती मुलं गावावरुन परतताच त्यांचे मायबाप त्यांना खाण्याचे पदार्थ बांधून देत. त्यातच काही पैसेही देत.
         वसतीगृहाचा एक अधिकारी होता. हा अधिकारी वसतीगृहातील कार्यालयात सकाळी दहा ते रात्री सातपर्यंत राहात असे. त्यानंतर तो लवकरच घरी निघून जात असे.
          तो लवकरच घरी निघून जात होता. त्याचं कारणंही होतं. ते म्हणजे त्याला असलेला गुंडाचा धाक. तो तडीपार गुंड होता. तो गुंड सात वाजल्यानंतर वसतीगृहात यायचा. कधीकधी तो वसतीगृहात दिवसाही यायचा. त्यातच तो त्या वसतीगृहातील अधिकारी वर्गाकडून पैसा वसूल करायचा. ते अधिकारी देखील त्याला पैसा देत. कारण तो त्यांना ठार करण्याचीच धमकी द्यायचा. त्यातच त्याची पोलिस तक्रार करायचीही भीती वाटायची. कारण पोलिस स्टेशनमधूनही तो लवकर सुटायचा.
          तो गुंड रात्री जेव्हा यायचा. तेव्हा सणासुदीला आणलेले पैसे विद्यार्थ्यांकडून हिसकायचा. नाही दिल्यास मारहान करायचा. त्यातच त्या पैशातून फक्त दारु प्यायचा.
           त्याची एकदा पोलिस स्टेशनला तक्रार केली गेली. पोलिसांनी त्याला पकडूनही नेले. परंतू आश्चर्याची गोष्ट अशी की दुस-याच दिवशी तो वसतीगृहात हजर. असे बरेचदा झाले. शेवटी काही विद्यार्थ्यांनी त्याच्या धाकानं वसतीगृह सोडलं व अशारितीनं वसतीगृहच बंद पडलं.
            आज समाजात असेच गुंड तयार होत आहेत. त्यांना पोलिसस्टेशनचा धाक राहिलेला नाही. तसेच न्यायालयाचा तर नाहीच नाही. व्यतिरीक्त न्यायालय अशा गुंडाची ग्राऊंडलेवल तपासत नाही. त्यातूनच गुंड वाढत आहेत. गुंडेगीरीही वाढत आहे. साध्या रस्त्यावरच्या बाजारात गुंड फिरत असतात. ते गुंड बाजारातून पैसा वसूल करीत असतात. काही गुंड भर रस्त्यावर बलत्कारही करीत असतात. काही छेडखान्याही राजरोष करीत असतात. त्यातच काही गळ्यातील चैना तोडत असतात. परंतू प्रशासन त्यांना शिक्षेचे दोषी न समजता त्याची लवकर न्यायालयीन कोठडीतून सुटका करते आणि जे मुळात गुन्हेगार नसतात. त्यांना मात्र कोर्टाचे चक्कर मारायला लावते. आज अशीच रीत सुरु आहे.
          न्यायालयीन प्रकरणानं तंग आलेल्या सभ्य माणसांना आत्महत्याही कराव्याश्या वाटतात. पण सभ्य माणसांपुढंच विचार असतो. तो म्हणजे त्याचा परीवार. त्याच्या परीवारापुढं ते दुर्बल असतात नव्हे तर न्यायालयात त्याच परीवारामुळं आशेने तारीख तुटण्याची आशा बाळगून कोर्टाचे चक्कर मारत असतात.
            कोर्टानं अलिकडं अशी दिरंगाई करु नये. ज्या खटल्यात तथ्य नाही, ते खटले ताबडतोब निपटंवावेत. मात्र जे गुन्हेगारीचे खटले आहेत. त्यात त्यांची पाश्वभुमी तपासावी. त्यातच त्या पाश्वभुमीवरुन कडक अशाच शिक्षा कराव्यात. जेणेकरुन ते पुन्हा गुन्हे करणार नाही. लोकांनीही न्यायालयाचा मान राखावा. उगाचंच भांडणं करु नये. भांडणातून विनाकारण न्यायालयाची धाव घेवू नये. न्यायालयात न्यायीक प्रकरणाची गर्दी करु नये. तसेच भांडणामध्ये विनाकारण वेळ वाया घालवू नये. देश अापला आहे. आपण देशाचे आहोत याचा विचार करावा. त्याचप्रमाणे न्यायालयही आपले आहे याचाही विचार करावा.

          अंकुश शिंगाडे नागपूर ९३७३३५९४५०

जाहिरात

Suvidha Online Raver


 


SuvarDip News Android App
⬆️ येथे क्लिक करून Download करा ⬆️