नागपूर जिल्ह्यात आजपासून ग्रामीण भागातील शाळांना सुरुवात

नागपूर -  जिल्ह्यातील कोविड प्रोटोकॉल पाळत सर्व शाळांची सुरुवात उद्या 1 डिसेंबर पासून होणार आहे. जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी प्राथमिक यांनी रात्री उशिरा या संदर्भात आदेश जारी केले आहे. नागपूर जिल्ह्यातील ग्रामीण भागातील पाचवी ते बारावी व शहरी भागातील आठवी ते बारावी पर्यंतच्या शाळा यापूर्वीच नियमितपणे सुरु झाल्या आहेत. उद्यापासून ग्रामीण क्षेत्र, नगरपालिका, नगर पंचायती क्षेत्रातील 2014 शाळा सुरु होत आहेत. 
[ads id="ads2"]
जिल्हाधिकारी विमला आर. यांच्याकडून मान्यता मिळाल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. शाळा सुरु करताना शंभर टक्के शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे लसीकरण आवश्यक केले आहे. एका बाकावर एकच विद्यार्थी, दोन बाकामध्ये सहा फूट अंतर व जास्त विद्यार्थी असणाऱ्या शाळांमध्ये दोन सत्रात वर्ग घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. 
[ads id="ads1"]
नागपूरातील शाळांबाबत 10 डिसेंबरला निर्णय
कोरोनाच्या ओमायक्रॉन या नवीन विषाणूचा प्रादुर्भाव लक्षात घेता नागपूर महानगरपालिकेने मनपा क्षेत्रातील इयत्ता 1ली ते 7 वी पर्यंतचे वर्ग सुरु करण्यास 10 डिसेंबर 2021 पर्यंत स्थगिती दिली आहे. कोरोना विषयक परिस्थितीचा आढावा घेऊन 10 डिसेंबर नंतर याबाबत पुढील आदेश निर्गमित करण्यात येईल.मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी मंगळवारी (ता. 30) यासंबधीचे आदेश जारी केले आहे. मात्र मनपा क्षेत्रातील इयत्ता 8 वी ते 12 वी चे वर्ग पूर्वीप्रमाणेच सुरु राहतील.  
 महाराष्ट्र शासनाने इयत्ता पहली ते सातवीच्या शाळा सुरु करण्यासंदर्भात सूचना दिली होती. मनपा आयुक्तांनी कोरोना विषाणुची परिस्थिती लक्षात घेता शाळा सुरु करण्याचा निर्णयावर स्थगिती दिली आहे. मंगळवारी निघालेल्या शिक्षण विभागाच्या परिपत्रकानुसार इयत्ता 1 ली ते 7 वी पर्यंतचे नियमित वर्ग पुढील आदेशापर्यंत पूर्णत: बंद राहतील. मात्र या वर्गांचे ऑनलाईन शिक्षण सुरु राहील.
          सध्या कोरोना विषाणुचा नवा प्रकार "ओमायक्रॉन" आढळून आला असून जागतिक आरोग्य संघटनेने सदर विषाणु प्रकारास व्हेरीयंट आफ कंर्सन म्हणून जाहीर केले आहे. त्यामुळे नागरिकांनी सर्व कोविड नियमांचे पालन करावे आणि घराबाहेर पडताना मास्क, सतत सॅनिटायझर आणि सामाजिक अंतर राखून व्यवहार करावे, असे आवाहन मनपा आयुक्त राधाकृष्णन बी यांनी केले आहे.

जाहिरात

Suvidha Online Raver


 


SuvarDip News Android App
⬆️ येथे क्लिक करून Download करा ⬆️