राज्यातील पहिली ते सातवीच्या शाळा लवकरच सुरू होणार ?

मुंबई प्रतिनिधी (सुशिल कुवर) राज्यातील पहिली ते सातवीच्या शाळा सुरू करण्याबाबत कोरोना टास्क फोर्सकडून हिरवा कंदील दाखवण्यात आला आहे. शाळा सुरू करण्याबाबत इतर बाबींची पूर्तता राज्य शासनाने पूर्ण केल्यास शाळा सुरू करण्यास काहीच हरकत नसल्याचे कोरोना टास्क फोर्सचे म्हणणे आहे.
[ads id="ads2"] जेव्हा लहान मुलांसाठी लस उपलब्ध करून दिली जाईल, तेव्हा लहान मुलांचे लसीकरण सुरू होईल. पण त्यापूर्वी शाळा सुरू करण्यास हरकत नसल्याचे ही कोरोना टास्क फोर्समधील डॉक्टरांचे म्हणणे आहे. जरी कोरोना टास्क फोर्स ने हिरवा कंदील दिला असला, 
[ads id="ads1"] तरी कॅबिनेट बैठकीत सोबतच मुख्यमंत्र्यांसोबत शाळा सुरू करण्याचा निर्णय बाबत चर्चा केली जाणार आणि त्यानंतर राज्यातील पहिली ते सातवीच्या शाळा सुरू करण्याबाबत निर्णय घेतला जाईल.

कोरोना स्थिती नियंत्रणातमध्ये

राज्यातील पहिली ते सातवीच्या शाळा सुरू करण्याबाबत पुढील दहा दिवसांमध्ये सर्वांशी चर्चा करून शिक्षण विभाग निर्णय घेऊ शकतो.
शहरी भागात टप्याटप्याने शाळा सुरू करायच्या किंवा पहिली ते सातवीच्या शाळा सुरू करायच्या याबाबत शिक्षण विभागाने आपली तयारी बघून निर्णय घ्यावा, असेही कोरोना टास्क फोर्सने स्पष्ट केले आहे. राज्यातील कोरोनाची स्थिती आता नियंत्रणामध्ये आल्याचे दिसत असल्यामुळे राज्य सरकारने अनेक गोष्टी सुरू केल्या आहेत.

जाहिरात

Suvidha Online Raver


 


SuvarDip News Android App
⬆️ येथे क्लिक करून Download करा ⬆️