एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, नंदुरबार अंतर्गत सुरु असलेल्या 28 शासकीय वसतीगृहात प्रवेशासाठी अर्ज सादर करा..

[ads id="ads2"]
नंदुरबार - अनुसूचित जमातीच्या विद्यार्थी व विद्यार्थींनीना सन 2021-2022 या शैक्षणिक वर्षांसाठी प्रकल्प अधिकारी, एकात्मिकआदिवासी विकास प्रकल्प, नंदुरबार अंतर्गत सुरु असलेल्या 28 शासकीय वसतीगृहामध्ये प्रवेशासाठी अर्ज सादर करावे.
[ads id="ads1"]
 प्रवेशासाठी इयत्ता आठवी, अकरावी, प्रथम वर्ष पदवी, पदविका, पदव्युत्तर, डी. टी. एड, बी.एड साठी वसतीगृहातील रिक्त जागेनुसार व गुणवत्तानिहाय प्रवेश देण्यात येईल. तरी जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी https://swayam.Mahaonline.gov.in या संकेतस्थळावर प्रवेशासाठी 30 नोव्हेंबर 2021 पर्यंत अर्ज सादर करावे असे आवाहन प्रकल्प अधिकारी तथा सहायक जिल्हाधिकारी मीनल करनवाल यांनी केले आहे.

जाहिरात


Suvidha Online Raver


 


SuvarDip News Android App
⬆️ येथे क्लिक करून Download करा ⬆️