वाशिम - शैक्षणिक सत्र सन 2019-20 आणि सन 2020-21 यामध्ये कोविड-19 मुळे असाधारण परिस्थिती निर्माण झाल्याने विद्यार्थ्यांचे या दोन्ही शैक्षणिक वर्षाचे प्रवेश एकत्रितरीत्या सन 2021-22 या वर्षी समाज कल्याण विभागाअंतर्गत शासकीय वसतीगृहाकरीता देण्यात येणार आहे. वसतीगृहातील रिक्त जागांच्या प्रवेशासाठी वेळपत्रक निश्चित केले आहे.
[ads id="ads2"] जिल्ह्यातील सर्व इच्छुक प्रवेशित विद्यार्थी हे अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मार्गासवर्ग व विशेषमागास प्रवर्गातील इयत्ता 8 वी ते 12 वी उर्त्तीण विद्यार्थ्यांना तसेच वरिष्ठ महाविद्यालयातील इतर शैक्षणिक व्यावसायिक अभ्यासक्रमातील प्रथम व व्दितीय वर्षाच्या प्रवेशित विद्यार्थ्यांना शासकीय वसतीगृहात प्रवेश देता येईल. [ads id="ads1"]
22 नोव्हेंबरपर्यत ज्या इच्छुक प्रवेशिक विद्यार्थ्यांनी अर्ज प्राप्त करुन घेतले असतील त्यांनी 26 नोव्हेंबरपर्यत आवश्यक त्या कागदपत्रासह संबंधित वसतीगृह गृहपालांकडे अर्ज सादर करावे.
सन 2021-22 या शैक्षणिक वर्षाच्या सत्रात प्रवेश प्रक्रीया पुर्ण करण्याच्या दृष्टीने खालील प्रमाणे वेळापत्रक निश्चित केले आहे. 26 नोव्हेंबर 2021 अर्ज भरण्याची शेवटची तारीख 28 नोव्हेंबर 2021- मेरीट लिस्ट प्रसिध्द करणे. 29 नोव्हेंबर 2021- पहिली प्रवेश यादी प्रसिध्द करणे. (रिक्त जागांनुसार पात्र विद्यार्थ्यांची मेरीट लिस्टनुसार गुणानुक्रमे प्रवेश यादी) 29 नोव्हेंबर 2021- दुसरी आणि तिसरी प्रवेश यादी प्रसिध्द करणे. 3 डिसेंबर 2021- पहिली प्रवेश यादीनुसार प्रवेश घेण्याची अंतिम तारीख 4 डिसेंबर 2021 दुपारी 1 वाजतापर्यत- दुसरी प्रवेश यादीनुसार प्रवेश अंतिम करणे आणि सायंकाळी 5 वाजतापर्यत दुसरी प्रवेश यादी नुसार प्रवेश अंतिम करणे. असे वेळापर्यत निश्चित केले आहे. तरी विद्यार्थ्यांनी वसतीगृहातील रिक्त जागेचा लाभ घ्यावा. असेआवाहन समाज कल्याणचे सहायक आयुक्त मारोती वाठ यांनी केले आहे.