जळगाव : जुवार्डी, ता. भडगाव, जि. जळगाव येथील प्लॉट भागात 20 दिवसांचा मुलगा निराधार अवस्थेत आढळून आला आहे. त्याला भडगाव पोलिसांनी ताब्यात घेवून जिल्हा रुग्णालय, जळगाव येथे उपचारासाठी दाखल केले. भडगाव पोलिसांनी बालकल्याण समितीच्या अध्यक्षांना याबाबतची माहिती दिली.
[ads id="ads2"]
बालकल्याण समिती, औरंगाबाद यांच्या आदेशाने सदरच्या बालकास 14 ऑक्टोबर 2021 रोजी भारतीय समाज सेवा केंद्र, औरंगाबाद येथे दाखल करण्यात आले. तेथे त्याचे यश असे नामकरण करण्यात आले असून तो भारतीय समाज सेवा केंद्र, औरंगाबाद येथे आहे.
[ads id="ads1"] यशचे पालक व नातेवाईकांनी 30 दिवसांच्या भारतीय समाज सेवा केंद्र, अनिकेतन, प्लॉट क्रमांक 151, सर्वे क्रमांक 15, बी. एस. जी. एम. शाळेसमोर, गुरू सहानी नगर, एन/4, सिडको, औरंगाबाद, दूरध्वनी : 0240- 2453922, मा. अध्यक्ष, बालकल्याण समिती, द्वारा, शासकीय मुलांचे निरीक्षण गृह, एन-12, ताज हॉटेलच्या मागे, हडको, औरंगाबाद, मा. अध्यक्ष, बालकल्याण समिती, जिल्हाधिकारी रस्ता, जिल्हा पेठ, जळगाव, दूरध्वनी 0257- 2239550, पोलिस निरीक्षक, भडगाव पोलिस ठाणे, भडगाव, जि. जळगाव, दूरध्वनी : 02562- 213333 येथे संपर्क साधावा.
या कालावधीत संबंधितांनी संपर्क न साधल्यास यशच्या कायमस्वरूपी पुनर्वसनाचा अन्य निर्णय बाल कल्याण समिती, औरंगाबाद यांच्या आदेशाने घेवू शकेल, असे वनिता सोनगत, सदस्य सचिव, जिल्हा बाल संरक्षण कक्ष तथा जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी, जळगाव यांनी प्रसिध्दीस दिलेल्या शासकीय पत्रकान्वये कळविले आहे.