रस्ते अपघातात 11 जण ठार तर 22 जण जखमी

[ads id="ads2"]
जयपूर - राजस्थानच्या बाडमेर जिल्ह्यात बुधवारी झालेल्या एका रस्ते अपघातात 11 जण ठार तर 22 जण जखमी झाले. जिल्हा पोलीस अधीक्षक दीपक भार्गव यांनी दिलेल्या माहितीनुसार बांदियावासजीक बस आणि ट्रक यांच्यात झालेल्या धडकेने हा अपघात झाला. 
[ads id="ads1"]
 या धडकेनंतर बस आणि ट्रकला आग लागली, यात 11 प्रवासी ठार आणि 22 जण जखमी झाले. त्यांनी सांगितले की घटनास्थळी 10 मृतदेह सापडले आहेत, एका जखमीचा रुग्णालयात मृत्यू झाला, तर गंभीर जखमींना जोधपूरला पाठवण्यात आले आहे.

 या दुर्घटनेबद्दल शोक व्यक्त करताना मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी ट्विट केले की, "बाडमेरमधील बस-ट्रक अपघातासंदर्भात, बाडमेरच्या जिल्हा दंडाधिकार्‍यांशी फोनवर बोलून त्यांना मदत आणि बचाव कार्याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत. जखमींवर सर्वोत्तम उपचार केले जातील.

जाहिरात

Suvidha Online Raver


 


SuvarDip News Android App
⬆️ येथे क्लिक करून Download करा ⬆️