धुळे-नंदुरबार स्थानिक प्राधिकारी मतदार संघाचा निवडणूक कार्यक्रम घोषित 10 डिसेंबर रोजी होणार मतदान...

[ads id="ads2"]
नंदुरबार, - महाराष्ट्र विधान परिषदेच्या धुळे-नंदुरबार स्थानिक प्राधिकारी मतदार संघासाठी भारत निवडणूक आयोगाकडून निवडणूक कार्यक्रम घोषित करण्यात आला आहे. महाराष्ट्र विधान परिषदेच्या धुळे-नंदुरबार स्थानिक प्राधिकारी मतदार संघाची मुदत 1 जानेवारी, 2022 रोजी पुर्ण होत 
[ads id="ads1"]
असल्याने या रिक्त होणा-या जागेकरिता भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार निवडणूक कार्यक्रम घोषित करण्यात आला असून आजपासून आचार संहिता लागू झाली आहे.

या मतदार संघासाठी शुक्रवार, दिनांक 10 डिसेंबर, 2021 रोजी सकाळी 8 ते सायंकाळी 4 वाजेपर्यंत मतदान होईल. मंगळवार, 14 डिसेंबर, 2021 रोजी मतमोजणी होणार असून गुरुवार, 16 डिसेंबर, 2021 पर्यंत निवडणूक प्रक्रिया पूर्ण करावयाची आहे, असे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणुक अधिकारी मनीषा खत्री यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.

जाहिरात

Suvidha Online Raver


 


SuvarDip News Android App
⬆️ येथे क्लिक करून Download करा ⬆️