कराड प्रतिनिधी(अॅड बसवराज होसगौडर)गुप्त माहितीनुसार काही लोक ओगलेवाडी येथे जिवंत वन्यजीव मांडूळ व कासव विक्रीसाठी घेवून येणार असल्याची गुप्त माहिती मिळाली, दुपारी १.३० वा . ४ आरोपी हे दोन दुचाकीवरुन राजमाची येथे सांजसावली हॉटेलमध्ये जेवण करत बसले होते .
[ads id="ads1"]
सदर आरोपींच्या हालचाली संशयास्पद दिसून आल्या . वनविभागाचे श्री महेश झांजुर्णे , सहाय्यक वनसंरक्षक ( वनी व कॅम्पा ) , सातारा , रोहन भाटे , मानद वन्यजीव रक्षक , सातारा , विजय भोसले , वनरक्षक फि . प . सातारा , वनपाल मलकापूर वनपाल कोळे , वनरक्षक ओगलेवाडी , मलकापूर , नांदगाव , विजयनगर नाका , म्हासोली , कासारशिरंबे यांनी सांजसावली हॉटेल मध्ये जावून संशयीत आरोपी बालाजवळील साहित्याची झडती घेवून १ ) प्रशांत रामचंद्र रसाळ , वय २० वर्षे , रा . अकलूज ता . माळशिरस २ ) अविनाश आप्पा खुडे वय २१ वर्षे रा . अकलूज ता.माळशिरस
३ ) रोहीत साधू साठे , वय २० वर्षे रा . अकलूज ता.माळशिरस [ads id="ads2"]
४ ) सुनिल तानाजी सावंत वय २८ वर्षे रा . दिवड ता . माण यांच्या एका पिशवीत जिवंत कासव व एका पिशवीत जिवंत मांडूळ मिळून आले व २ मोटारसायकल जप्त करून वरील आरोपीवर वन्यजीव ( संरक्षण ) अधिनियम १ ९ ७२ चे कलम ९ , ३ ९ , ४८ अ , ४ ९ , ५० व ५१ अन्वये वनरक्षक ओगलेवाडी यांचेकडील प्र.गु.री. नं . ०६/२०२१ दि . १७.१०.२०२१ गुन्हा नोंद केला सदरची कारवाई श्री महादेव मोहीते , उपवनसंरक्षक , सातारा वनविभाग , सातारा यांचे मार्गदर्शनाखाली मा .श्री महेश झांजुर्णे , सहा . वनसंरक्षक ( वनी व कॅम्पा ) सातारा व श्री . तुषार नवले वनक्षेत्रपाल कराड , श्री रोहन भाटे मानद वन्यजीव रक्षक सातारा श्री विजय भोसले , वनरक्षक फि.प.सातारा श्री ए.पी. सवाखंडे , वनपाल मलकापूर , श्री बी . सी . कदम , वनपाल कोळे , वनरक्षक उत्तम पांढरे, अरुण सोळंकी , उमेश जाधवर , सचिन खंडागळे , संतोष यादव , सुभाष गुरव , सुनिता जाधव , शितल पाटील , दिपाली अवघडे सदरच्या कारवाई मध्ये हे सर्व सहभागी होते .