कृषी विज्ञान केंद्र, तडसर, तालुका कडेगाव, जिल्हा सांगली यांचेमार्फत हवामान अनुकूल शेती तंत्रज्ञान या विषयावर तडसर येथे शेतकरी परिसंवाद आयोजित

सांगली(विशेष प्रतिनिधी :- अँड बसवराज होसगौडर) कृषी विज्ञान केंद्र, तडसर, तालुका कडेगाव, जिल्हा सांगली यांचेमार्फत हवामान अनुकूल शेती तंत्रज्ञान या विषयावर दिनांक 18 ऑक्टोबर 2021 रोजी तडसर येथे शेतकरी परिसंवाद आयोजित करण्यात आला. 
[ads id="ads1"] सदर परिसंवादामध्ये महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठाचे माननीय संचालक, विस्तार शिक्षण आणि कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. अनिल भिकाने यांनी बदलत्या हवामानाचा शेतीवर होणारा परिणाम आणि त्यानुसार शेती आणि पशुपालन व्यवसायात आवश्यक असणारे बदल याविषयी तडसर व आसपासच्या परिसरातील 100 हून अधिक शेतकऱ्यांशी संवाद साधला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून क्रांतिसिंह नाना पाटील पशुवैद्यकीय महाविद्यालयाचे माननीय सहयोगी अधिष्ठाता डॉ. विलास आहेर हे उपस्थित होते. डॉ. विलास आहेर यांनी 
[ads id="ads2"] शेती आणि पशुपालनातून आर्थिक उन्नती साधण्यासाठी आपण कसे प्रयत्नशील रहावे याविषयी मार्गदर्शन केले. सदर कार्यक्रमांमध्ये गावचे सरपंच श्री हनुमंतराव पवार यांनी कृषी विज्ञान केंद्राच्या माध्यमातून परिसराचा विकास साधण्यासाठी ग्रामस्थांना आवाहन केले. तसेच सदर कृषी विज्ञान केंद्राच्या उभारणीसाठी एकत्रितपणे काम करण्यासाठी त्यांनी ग्रामस्थांना आवाहन केले. त्याचप्रमाणे तडसर गावचे ज्येष्ठ नागरिक आणि लोकनेते श्री. व्यंकटरावजी पवार (आप्पा) यांनी शेती आणि पशुसंवर्धनातून आपल्या परिसराच्या विकासास पक्षभेद आणि हेवेदावे विसरून साथ देण्याचे आवाहन केले. या कार्यक्रमादरम्यान काही दिवसांपूर्वी कृषी विज्ञान केंद्रामार्फतआयोजित केलेल्या ऑनलाइन वराहपालन प्रशिक्षणाचे प्रमाणपत्र वितरण डॉ. अनिल भिकाने आणि डॉ. विलास आहेर यांच्या हस्ते प्रशिक्षणार्थींना करण्यात आले. सदर कार्यक्रमास सहाय्यक आयुक्त, पशुसंवर्धन विभाग, डॉ. महादेव गवळी तसेच जिल्ह्यातील पशुवैद्यक व पशुधन विकास अधिकारी डॉ. भाळे, डॉ. मुसळे, डॉ. सचिन वंजारी, डॉ. सचिन रहाणे इ. उपस्थित होते. त्याचबरोबर सहाय्यक पशुधन विकास अधिकारी श्री तानाजी साळुंखे आणि पशुधन पर्यवेक्षक श्री समीर मुल्ला हे उपस्थित होते. सदर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख डॉ. अनिल उलेमाले व क्रांतिसिंह नाना पाटील पशुवैद्यकीय महाविद्यालयाचे सहाय्यक प्राध्यापक डॉ. विकास कारंडे यांनी काम केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन कृषी विज्ञान केंद्राचे विषय विशेषज्ञ श्री. दादासाहेब खोगरे आणि योगेश सरगर यांनी केले.

जाहिरात


Suvidha Online Raver


 


SuvarDip News Android App
⬆️ येथे क्लिक करून Download करा ⬆️