जळगाव जिल्ह्यातील धक्कादायक प्रकार ; बनावट फेसबुक अकाउंट उघडून अश्लील फोटो टाकून अधिकाऱ्याच्या पत्नीची बदनामी ; सायबर पोलीसात गुन्हा दाखल

जळगाव - जळगाव जिल्ह्यातील एका शहरातील नगरपालिका अधिकारी यांच्या पत्नीची बनावट फेसबुक चालवून बदनामी केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस झाला आहेे.[ads id="ads1"]
   तर या फेसबुक अकाऊंटवरून अश्लील फोटो अपलोड करून जिल्ह्यातील अधिकाऱ्याच्या पत्नीची बदनामी केली याप्रकरणी अज्ञात व्यक्तीविरोधात सायबर पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 
 यात विशेष म्हणून अज्ञात व्यक्तीने बनावट फेसबुक तयार करून चार ते पाच प्रकारचे फोटो अपलोड केले आहे. [ads id="ads2"] 
  त्यात संबंधीत अधिकाऱ्याच्या पत्नीचे नाव टाकले असल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी संबंधीत अधिकाऱ्यांनी जळगाव सायबर पोलीसात अज्ञात व्यक्तीविरोधात तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून सायबर पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सायबर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक लिलाधार कानडे करीत आहेत.

जाहिरात


Suvidha Online Raver


 


SuvarDip News Android App
⬆️ येथे क्लिक करून Download करा ⬆️