गॅस दराच्या भडक्याने ग्रामीण भागात पुन्हा पेटू लागल्या चुली

[ads id="ads2"]
कळवण प्रतिनिधी  (सुशिल कुवर ) सणासुदीच्या तोंडावर स्वयंपाकाच्या गॅस दरात होणार्‍या वाढीचा ग्रामीण भागातील सर्वसामान्य नागरिकांना फटका बसला असून महिलांवर सरपण गोळा करण्याची वेळ आली आहे.
[ads id="ads1"]
दिवाळी सण काही दिवसांवर येऊन ठेपला असताना गॅस दरातील वाढ सर्वसामान्य जनतेला व महिलांना डोकेदुखी ठरत आहे. ‘उज्ज्वला’ योजनेअंतर्गत केंद्र सरकारने गॅस जोडण्यांचे वितरण केले असले तरी गॅस टाकी आणण्यासाठी पैसे आणायचे कुठून? हा प्रश्न सर्वसामान्य महिलांना पडला आहे. उज्ज्वला योजनेत सहभागी झालेल्या कुटुंंबातील रिकामी झालेली गॅस टाकी अनेक महिन्यांपासून घरातील कोपर्‍यात पडून असल्याचे व स्वयंपाक चुलीवर करावा लागत असल्याचे चित्र दिसून येत आहे. पूर्वी स्टोव्हसाठी अथवा चूल पेटविण्यासाठी देखील रॉकेलचा सर्रास वापर व्हायचा पण आता रॉकेल देखील उपलब्ध नाही. त्यामुळे चुलीवर स्वयंपाक करणे गृहिणींसाठी मोठे त्रासदायक काम ठरत आहे.

गॅसची मुलभूत किंमत 495 रुपये, केंद्र सरकार कर 24 रुपये 75 पैसे, वाहतूक 10 रुपये, म्हणजे एकूण किंमत 529 रुपये 75पैसे, राज्य सरकार कर 291 रुपये 36 पैसे, राज्यातील ट्रान्सपोर्ट खर्च 15 रुपये, डिलर्स कमिशन 5 रुपये 50 पैसे, अनुदान 19 रुपये 57 पैसे या सर्व गोष्टी मिळून जवळपास एक गॅस सिलिंडरला 861 रुपये 18 पैसे ग्राहकांना मोजावे लागत आहे.त्यात ग्रामीण भागात तर प्रति गॅस सिलेंडरला 960 रुपये मोजावे लागत आहे. परंतु यातही आता पंधरा रुपयाने वाढ झाली आहे. दरवाढीत दोन्ही सरकारे जबाबदार आहे असे सर्वसामान्य जनतेतून आवाज आता ऐकू येत आहे.

जाहिरात


Suvidha Online Raver


 


SuvarDip News Android App
⬆️ येथे क्लिक करून Download करा ⬆️