बेकायदेशीरीत्या घातक शस्त्र बाळगणारा स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात ; १ लाख २८ हजार रुपये किंमतीच्या २० तलवारी जप्त

 


नंदूरबार : आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती पोट निवडणुक  व नवरात्रौत्सव दरम्यान समाजकंटकांवर गुन्हेगारांवर अंकुश राहावा यासाठी पोलीस दलातर्फे उपाययोजना करण्यात येत आहेत.धडगाव येथून एकाच्या ताब्यातून 1 लाख 28 हजार रुपये किमंतीची 20 लहान मोठ्या धारदार तलवारी जप्त केल्या.याप्रकरणी एकास अटक करण्यात आली आहे.[ads id="ads1"]

आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती पोट निवडणुक 2021 व नवरात्रौत्सव दरम्यान समाजकंटकांवर गुन्हेगारांवर अंकुश राहावा तसेच निवडणूका व सण उत्सव भयमुक्त वातावरणात पार पाडावेत यासाठी खबरदार म्हणून  पोलीस उप महानिरीक्षक , नाशिक परिक्षेत्र , नाशिक यांनी जिल्हा परिषद व पंचायत समिती पोर निवडणुकीच्या अनुषंगाने नंदुरबार जिल्हा भेटी दरम्यान अवैध शस्त्रांवर कारवाई करण्याच्या सुचना दिलेल्या होत्या तसेच नंदुरबार जिल्हा पोलीस अधीक्षक पी.आर.पाटील यांनी देखील स्थानिक गुन्हे शाखेला अवैध शस्त्रांव कारवाई करणेबाबतचे आदेश दिले होते .त्या अनुषंगाने दि. 4 ऑक्टोंबर रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर यांन गुप्त बातमीदाराकडून बातमी मिळाली की,

धडगाव गावात मुख्य रस्त्यावर एक इसम हा त्याच्या शेती औजा विक्रीच्या दुकानात मानवी जिवितास घातक असलेल्या लोखंडी बनावटीच्या तलवारी बेकायदेशीररीत्या कब्जात बाळगुन आहे अशी बातमी मिळाल्याने स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे एक पथक तयार करुन त्यांना तात्काळ धडगांव येथे जावुन खात्री करुन पुढील कायदेशीर कारवाई करण्याबाबत सूचना दिल्याने स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने धडगाव येथे जावुन खात्री केली असता धडगाव गावातील मुख्य रस्त्यावर एव इसम पत्र्याच्या टपरी बाहेर संशयास्पद हालचाली करतांना दिसुन आला म्हणून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने त्यास ताब्यात  घेतले.[ads id="ads2"]

  त्याच्या मालकीच्या टपरीची झडती घेतली असता तिथे 1 लाख 28 हजार रुपये किमंतीची 20 लहान मोठ्या धारदार तलवारी मिळुन आल्या. याप्रकरणी संजय कागडा वळवी  रा . कात्री ता . धडगाव याच्या विरुद पोलीस ठाण्याला भारतीय हत्यार कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे . सदर कारवाईमुळे अवैध शस्त्र बाळगणाऱ्या गुन्हेगारांच्या मनात भितीचे वातावरण निर्माण झालेले असुन भविष्यात कोणी अवैध शस्त्र जवळ बाळगल्यास त्यांची गय केली जाणार नाही , असा नंदुरबार जिल्ह पोलीसांकडुन इशारा दिलेला आहे . सदरची कारवाई पोलीस अधीक्षक , नंदुरबार पी . आर . पाटील यांच्या नेतृत्वाखाली अपर पोलीस अधीक्षक  विजय पवार , स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर , सहा . पोलीस निरीक्षक  संदीप पाटील पोलीस हवालदार विनोद जाधव , पोलीस नाईक जितेंद्र अहिरराव , पोलीस अमंलदार अभिमन्यु गावी दिपक न्हावी , रमेश साळुंके यांनी केली आहे .

जाहिरात

Suvidha Online Raver


 


SuvarDip News Android App
⬆️ येथे क्लिक करून Download करा ⬆️