त्यांनी विभागातील सर्व प्राध्यापक व कर्मचारी यांना माहिती दिली व त्या सर्पावर दूरुनच लक्ष ठेवून *सर्पमित्र भीमसेन लोकरे* यांना या. घटनेची माहिती दिली. *सर्पमित्र भीमसेन लोकरे* व *सर्पमित्र रविचंद्र स्वामी* यांनी तात्काळ अवघ्या ५ ते १०मिनिटांतच घटनास्थळी दाखल झाले. प्राध्यापकांनी सापावर लक्ष ठेवल्याने तो सर्प खिडकीतून आत शिरून लोखंडी कपाटाच्या खाली जावून बसल्याचे त्यांनी पाहिले व सर्पमित्रांना याची कल्पना दिली. [ads id="ads1"]
सर्पमित्रांनी पाहणी केली असता तो सर्प धामण जातीचा बिनविषारी सर्प असल्याचे त्यांच्या लक्षात आले.
*सर्पमित्र भीमसेन लोकरे* यांनी यांनी त्या सर्पास सुरक्षित पकडून बाहेर काढले व तेथील प्राध्यापक व कर्मचारी यांना त्या सापाची माहिती दिली.
दरम्यान त्या ठिकाणी खिडकी जवळ आंब्याचे मोठे झाड असल्याने तो सर्प तेथूनच इतक्या उंचीवर आला असल्याचे *सर्पमित्र भीमसेन लोकरे* यांनी सांगितले.