तथागत बुद्धांचे विचार जीवनाला तारणारे ... अतिशभाई खराटे
रणगाव येथे तथागत बुद्ध मूर्ती प्रतिष्ठापणा सोहळा संपन्न
मलकापूर जि. बुलढाणा (प्रतिनिधी) करुणा मैत्री बुद्ध विहार समिती रणगाव यांच्या विद्यमाने 65 व्या धमचक्क प्रवर्तन वर्ष अनुषंगाने रणगाव ता.मलकापूर येथे संपूर्ण विश्वाला शांतीचा संदेश देणारे तथागत गौतम बुद्ध यांचा मूर्ती प्रतिष्ठापणा सोहळा उत्साहात पार पडला. [ads id="ads2"]
कार्यक्रमाचे उद्घघाटक वंचित बहुजन आघाडी बुलडाणा जिल्हा महासचिव अतिशभाई खराटे हे होते,तर कार्यक्रमाचे अध्यक्ष भारतीय बौद्ध महासभा जिल्हाध्यक्ष एस.एस. वले सर होते, तथा प्रमुख अतिथी म्हणून वंचितचे जिल्हा संघटक भाऊराव उमाळे, भा.बौध्द म.तालुकाध्यक्ष राजू शेगोकार,शहर अध्यक्ष एम. ओ. सरकटे,प्रबुद्ध भारत महासंघाचे संस्थापक अध्यक्ष संजय इंगळे, व. ब.आ. ता.उपाध्यक्ष गजानन झंनके, प्रबुद्ध महासंघ जिल्हाध्यक्ष भास्कर गोरे,अमोल होडगरे, एकनाथ होडगरे,रामेश्वर गोरे,रवी सोनोने यांची उपस्थिती होती. [ads id="ads1"]
कार्यक्रमाच्या सुरवातीला गावातून भव्य धम्म रॅली काढण्यात आली,यानंतर भंते पटजीत (सुजातपुर) यांचे हस्ते तथागत गौतम बुद्ध यांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली.
यावेळी लहान मुला मुलींनी प्रबोधनात्मक कार्यक्रम सादर केले
याप्रसंगी अतिशभाई खराटे यांनी तथागत बुद्धांनी समस्त मानवजातीच्या कल्याणासाठी समता,प्रेम,करुणामय जे विचार सांगितले आहे ते मानवी जीवनाला तारणारे विचार आहेत असे प्रतिपादन केले तसेच प्रमुख मान्यवरांनी सुद्धा उपस्थित जनतेला बौध्द धम्मावर मार्गदर्शन केले
कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी गणेश गोरे,विजय गोरे,गणेश रामचंद्र गोरे,कृष्णा सोनोने,वासुदेव एकनाथ गोरे,विठ्ठल मोरे,अरुण दशरथे,मुकेश गोरे,अनिल इंगळे,महादेव मोरे,भागवत गोरे,संजय गोरे,शेषराव वाघ,जगन गोरे,विकास वाघ,अंकुश दशरथे यांचे मार्गदर्शनाखाली अरुण होडगरे,राहुल गोरे,अतुल गोरे,सुभाष दशरथे,पवन दशरथे,अमर दशरथे,अजय शिंदे,निलेश इंगळे,सिद्धार्थ मोरे,अश्विन इंगळे,विशाल इंगळे यांनी परिश्रम