बससेवा सुरू नसल्याने विद्यार्थी शिक्षणापासून वंचित

अकोला ते कानशिवणी बससेवा सुरू करण्याची माजी जि.प.सदस्या प्रतिभा अवचार यांची मागणी

अकोला - कोरोना महामारीत अकोला ते कानशिवणी बससेवा शासनाच्या आदेशानुसार पुर्णतः बंद करण्यात आली आहे. परंतु आता शासनाने बहुतांश नियम शिथील केले आहे व सोबतच महाराष्ट्रभर बससेवा खुली करण्यात आली असतानाही अकोला ते कानशिवणी बससेवा अद्यापही बंदच आहे.
[ads id="ads1"]
 शाळा, कॉलेज, आय.टी.आय., ट्युशन क्लासेस सुरू झाले असुन बससेवा सुरू नसल्याने देशाचे पुढील भविष्य म्हणून ओळखल्या जाणारे विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहत आहेत. सोबतच व्यापारी वर्ग आणि ग्रामीण भागातील नागरिक हे दसरा व दिवाळी या सणानिमित्त अकोला येथे सतत येणे जाणे करतात व आपला उदरनिर्वाह चालवतात तेही बससेवा बंद असल्याने थांबले आहे करिता सकाळ, दुपार व संध्याकाळ अशा तिनही वेळेस अकोला ते कानशिवणी बससेवा हि बससेवा तात्काळ सुरू करावी 
[ads id="ads2"] अशी मागणी माजी जिल्हा परिषद सदस्या सौ. प्रतिभाताई अवचार यांनी महाराष्ट्र परिवाहन महामंडळाचे जिल्हा अधीक्षक यांना निवेदनाव्दारे केली आहे. या निवेदनावर पं. स. सदस्य राजेश वावकार, वंचितचे सह. जिल्हा प्रसिध्दी प्रमुख विकास सदांशिव, वंचितचे तालुकाध्यक्ष संजय निलखन, सर्कल अध्यक्ष प्रविण वाहुरवाघ, मिलिंद वानखडे, विंझोरा सरपंच रामदास गवई, देवळी सरपंच सौ वैशाली सदांशिव, येळवण सरपंच माणिकराव टोबरे, कातखेड मा. सरपंच गोरसिंग राठोड, कोठारी सरपंच महेंद्र इंगळे, शेतकरी नेते राजेश पोटे, जवळा दोडकी सरपंच गजानन चव्हाण, तंटामुक्ती अध्यक्ष संतोष किर्तक, ग्रा. पं. सदस्य रितेश किर्तक आदीनी सह्या केल्या आहेत.

जाहिरात

Suvidha Online Raver


 


SuvarDip News Android App
⬆️ येथे क्लिक करून Download करा ⬆️