सोयाबीनची मोईश्चर (आद्रता )च्या नावाखाली व्यापाऱ्यांकडून शेतकऱ्यांची होणारी लूट न थांबवल्यास संभाजी ब्रिगेड तर्फे तीव्र आंदोलन छेडण्यात येईल

या संदर्भात मंठा तहसीला निवेदन
[ads id="ads2"]
जालना प्रतिनिधी (माऊली बाहेकर) सततच्या अतिवृष्टी महागाईमुळे शेतकरी हवालदिल झालेला आहे मागील महिन्यात सतत अतिवृष्टी झाली त्यामध्ये शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून घेतलेला आहे त्यातून काही थोडेफार सोयाबीन हाती आली आहे
[ads id="ads1"]
 त्यामध्ये हमीभावापेक्षा अत्यंत कमी भाव ठरवून शेतकऱ्यांची दिशाभूल करून सोयाबीनला आद्रता आहे ती सुकवलेली नाही आली आहे आणि आमच्याकडे हा भाव आहे "विकायची तर विका, नसता विकू नका" अशा भाषेत बोलून शेतकऱ्यांकडून कमी भावाने सोयाबीन खरेदी होत आहे. शेतकऱ्यांना सोयाबीन विक्री केल्या शिवाय पर्याय नाही कारण याच पिकावर देणे-घेणे करणे, दवाखाना, दिवाळी, काही चिल्लर खरेदी करणे. याकरिता सोयाबीन विक्री केल्या शिवाय पर्याय नाही आणि अशा परिस्थितीत व्यापारी वर्ग नेहमी प्रमाणे शेतकऱ्यांची लूट करत आहे ही बाब निंदनीय आहे व्यापारी म्हणतात की मोशचीरायझर आहे तसेच काही ठिकाणी तर माप वजन काटा त्यामध्ये देखील तफावत दिसून येत आहे याची देखील चौकशी व पाहणी करणे आवश्यक आहे.

व्यापाऱ्यांना सक्त ताकीद देऊन शेतकऱ्यांची लूट थांबवणे बाबत आदेशित करावे नसता आपल्या कार्यालयासमोर सदरील मागणीकरिता संभाजी ब्रिगेड मंठा तर्फे तीव्र आंदोलन छेडण्यात येईल. अशी निवेदन तहसील कार्यालय येथे देण्यात आले.यावेळी सोमेश घारे जिल्हा कार्याध्यक्ष, संभाजी ब्रिगेड मंठा तालुका अध्यक्ष बाळासाहेब खवणे,आप्पासाहेब गिराम,आसाराम झोल,रमेश वाघमारे,भागवत गोरे, राजू घुंगरड,शुभम उबाळे,दीपक चाव्हरे,प्रभाकर गिराम
आदी उपस्थित होते.

जाहिरात

Suvidha Online Raver


 


SuvarDip News Android App
⬆️ येथे क्लिक करून Download करा ⬆️