शेतामध्ये फवारणी करत असताना विषारी औषध नाकात आणि तोंडात गेल्याने दोन शेतकऱ्यांचा दुदैवी मृत्यू झाल्याच्या घटना पारोळा तालुक्यात घडल्या आहेत. Parola तालुक्यातील, विचखेडा व शिरसमणी येथे या घटना घडल्या आहेत.[ads id="ads2"]
दयाराम भगवान बारी (रा.बारी गल्ली,पारोळा) हे विचखेडा शिवारातील राजू महाजन यांच्या शेतात फवारणी करत होते. फवारणी करतांना त्यांच्या नाकातोंडात विषारी औषध गेले. त्यामुळे त्यांना पारोळा कुटीर रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. या ठिकाणी उपचार घेत असताना दि.१५ रोजी दुपारी त्यांचा मृत्यू झाला.[ads id="ads1"]
तर दुसऱ्या घटनेत शिरसमणी येथील धनराज दगा पाटील (वय-५५) हे दि.१५ रोजी स्वत:च्या शेतात फवारणी करत होते. त्यांचाही नाकातोंडात विषारी औषध गेल्यामुळे त्यांना पारोळा कुटीर रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारा दरम्यान त्यांचा मृत्यू झाला.