शेतजमीन नसलेल्या सहा जणांचा पी.एम. किसान सन्मान योजनेत समावेश; ६ जणांविरुद्ध पोलिसात गुन्हा दाखल.

 

जळगाव विशेष प्रतिनिधी :  ज्यांच्या नावावर एक गुंठाही शेतजमीन नाही, अशांचा प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेत समावेश करून त्यांना अवैधरित्या लाभ मिळवून दिल्याचा प्रकार पारोळा तालुक्यात उघडकीस आला आहे.[ads id="ads2"] 

दरम्यान, याप्रकरणी ६ दलालांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

प्रधानमंत्री किसान सन्मान योजना ही केंद्र शासनाची एक महत्वाकांक्षी योजना असून या योजनेंतर्गत वर्षाकाठी सहा हजार रुपये थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होत असतात.[ads id="ads1"] 

   ज्याच्या नावावर शेतजमीन आहे, असेच शेतकरी या योजनेसाठी पात्र ठरतात. मात्र ज्यांच्या नावावर एक गुंठाही शेतजमीन नाही, अशा १८ बोगस लाभार्थ्यांचा या योजनेत समावेश करण्यात आला असल्याचा गैरप्रकार समोर आला आहे. पारोळा तालुक्यातील चोरवड येथील १८ लोकांना दलालांनी या योजनेचा लाभ मिळवून दिला आहे. लाभार्थ्यांकडून पैसे घेऊन व तहसीलदारांचे लॉगीन आयडी, पासवर्ड अनधिकृतपणे वापरून दलालांनी या योजनेचा लाभ मिळवून दिला, यामुळे शासनाची फसवणूक झाली आहे.

सहा जणांवर गुन्हे दाखल

याप्रकरणी तहसील कार्यालयाचे कर्मचारी नइमोद्दीन नसिरोद्दीन मुजावर यांच्या फिर्यादीवरून राहुल जगन्नाथ पाटील (चोरवड), प्रशांत उत्तम हटकर (कमतवाडी), महेश ज्ञानेश्वर खैरनार (मंगरूळ), देविदास जगन्नाथ जाधव (मंगरूळ), संजय धर्मा बाविस्कर (मोंढाळे प्र.उ), सचिन विठ्ठल पाटील उर्फ बाबाजी (शिरसमनी) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, तहसील कार्यालयातील सावळा गोंधळ व प्रशासनाचा निष्क्रियपणा यानिमित्ताने समोर आली आहे.

जाहिरात


Suvidha Online Raver


 


SuvarDip News Android App
⬆️ येथे क्लिक करून Download करा ⬆️