IPL च्या सामन्यावर सट्टा लावणाऱ्या तिघांना पोलिसांनी ठोकल्या बेड्या ; ६ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी


ठाणे - मुंबई इंडियन्स Vs दिल्ली कॅपीटल या दोन संघातील सामने शारजाह (UAE) येथे चालू होते. त्याचे TV आणि इंटरनेटवर प्रक्षेपण सुरु होते. यादरम्यान दिनांक २ ऑक्टों २०२१ रोजी बजाज व्हिला, गुरुद्वाराजवळ, उल्हासनगर क्रमांक तीन, ठाणे याठिकाणी क्रिकेटवर बेटींग होत असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक होनराव यांना मिळाली.

[ads id='ads1]

 याचआधारे होनराव यांच्या पथकाने दि २ ऑक्टों रोजी दुपारी वेळ ०५ : ३५ वाजण्याच्या सुमारास संशयित ठिकाणी छापा टाकला. तर या कारवाईमध्ये आहुजा तसेच राहूल बजाज (वय २९, उल्हासनगर, ठाणे) आणि धर्मेंद्र बजाज उर्फ कल्लु (वय ५३, रा. उल्हासनगर, ठाणे) यांना इंटरनेटद्वारा मोबाईलवर क्रिकेटचे सामने लावून लॅपटॉप आणि १३ मोबाईलच्या सहाय्याने बेटींग क्रिकेट वर (सट्टा) खेळताना रंगेहाथ पकडण्यात आले


 तर त्यांच्याकडून एक लॅपटॉप सह १३ मोबाइल आणि एक इंटरनेट राउटर या सोबत ट्रान्समिशन, १२ लाखांची रोकड असा १३ लाख ८१ हजारांचा रोखमुद्देमाल जप्त केरण्यात आला आहे. हे तिघेही वेबसाईटचा वापर करून ‘हारजीत’चा हिशोब लॅपटॉपमधील एका सॉफ्टवेअरमध्ये नोंद ठेवत होते.


 यात आहुजासह तिघांनी त्यांना या बेटींगची आयडी आणि पासवर्ड हे चेतन भाई यांनी पुरविल्याचे आणि ‘हारजीत’ने चेतनभाई हे त्याच्या खास व्यक्तीमार्फत घेऊन जात असल्याचेही त्यांनी सांगितले. 


याप्रकरणी मध्यवर्ती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असुन . ठाणे न्यायालयाने या तिघांनाही दि ६ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

जाहिरात

Suvidha Online Raver


 


SuvarDip News Android App
⬆️ येथे क्लिक करून Download करा ⬆️