शेतकऱ्यांवर गाडी चढविल्या प्रकरणी अखेर केंद्रीय मंत्र्यांच्या मुलाविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल ; हिंसाचारात एकूण 9 शेतकर्यांचा मृत्यू


उत्तर प्रदेश ( UP)- लखनौ लखीपुरात येथे काळे झेंडे दाखविणाऱ्या शेतकऱ्यांवर केंद्रीय गृह राज्य मंत्र्यांच्या मुलाने डायरेक्ट कार चढविल्याने काही जणांचा मृत्यू झाल्याची दुर्घटना घडली होती. त्यानंतर, संतापलेल्या आंदोलकांनी दोन गाड्यांची जाळपोळ केली आहे. 

[ads id=ads1]

त्यामध्ये जखमी झालेल्या एका पत्रकाराचाही मृत्यू झाल्याचे उघडकीस आले तर . त्यामुळे, येथील हिंसाचारात मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या 9 पर्यंत पोहोचली आहे. आता, याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला, उत्तर प्रदेशच्या लखीमपूर खीरीचे खासदार आणि गृह राज्य मंत्री अजय मिश्र टेनी यांचा मुलगा आशिष मिश्रा याने शेतकऱ्यांवर गाडी चढविल्याचा धक्कादायक प्रकारा विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे सविस्तर वृत्त असे की उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य एका कुश्तीच्या कार्यक्रमासाठी लखीमपूरच्या दौऱ्यावर गेले होते. 


त्यांच्या स्वागतासाठी केंद्रीय गृहराज्य मंत्री अजय मिश्रा टेनी यांचा मुलगा त्यासोबत काही कार्यकर्ते दोन तीन गाड्यातून मार्गक्रमण करत होते करायला ज्या मार्गावर ते होते त्याच मार्गावर कृषी कायद्यांच्याविरोधात काही शेतकरी आंदोलन करत होते. भाजप कार्यकर्ते आणि आंदोलक यांच्यात थोडी बाचाबाची झाली, 


आणि केंद्रीय गृहराज्य मंत्र्यांच्या मुलानं आंदोलक शेतकऱ्यांच्या अंगावरच गाडी घातल्याचा आरोप करण्यात येत आहे. मंत्र्याच्या मुलाचं नाव आशिष मिश्रा वर पोलिस ठाण्यात FIR दाखल करण्यात आली आहे. तर दुसरीकडे आंदोलक शेतकऱ्यांनीच आधी दगडफेक केली आणि त्यातूनच मग वाद वाढत गेला. त्याच घटनेत भाजपच्या 4 कार्यकर्त्यांचा मृत्यू झाल्याचाही आरोप भाजप समर्थकांकडून होत आहे

शेतकऱ्यांच्या तक्रारीच्या आधारे एफआयआर नोंदवला जाईल - एडीजी (कायदा व सुव्यवस्था) प्रशांत कुमार

काल लखीमपूर खेरीमध्ये मरण पावलेल्या 4 शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना सरकार 45 लाख रुपये आणि सरकारी नोकरी देणार आहे.  जखमींना 10 लाख रुपये दिले जातील.  शेतकऱ्यांच्या तक्रारीच्या आधारे एफआयआर नोंदवला जाईल.  उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश या प्रकरणाची चौकशी करतील: एडीजी (कायदा व सुव्यवस्था) प्रशांत कुमार


तो तीथे असता तर त्याला मारले गेले असते - गृह राज्यमंत्री अजय मिश्रा तेनी

भाजप कार्यकर्त्यांवर लाठ्या -तलवारीने हल्ला करून त्यांची हत्या करण्यात आली.  व्हिडिओ दाखवतात की काही हल्लेखोरांनी आमच्या कामगारांना असे म्हणण्यास सांगितले की मी त्यांना शेतकऱ्यांना कापणी करण्यास सांगितले होते.  माझ्या मुलावरील आरोप पूर्णपणे निराधार आहेत.  तो तेथे असता तर त्याला मारले गेले असते: गृह राज्यमंत्री अजय मिश्रा तेनी

जाहिरात

Suvidha Online Raver


 


SuvarDip News Android App
⬆️ येथे क्लिक करून Download करा ⬆️