....या कारणांमुळे तिघा सख्खा भावंडांना जन्मेठेपेची शिक्षा


सातारा - तालुक्यात असलेले बोरखळ येथे भरदिवसा चाकू, लोखंडी पाईप, लाकडी दांडके यांच्या साह्याने एकाला मारहाण करून खून करण्यात आला होता याप्रकरणी पहिले अतिरिक्त सत्र न्यायाधिश एन.एल. मोरे यांनी 3 सख्ख्ये भावांना जन्मठेपची शिक्षा ठोठावली. यादरम्यान रानामध्ये शेळ्या चरल्यानंतर त्यातून झालेल्या वादावादीतून ही घटना घडली होती.

[ads id='ads1]

रुपेश रसाळ, हेमंत रसाळ, सूरज रसाळ (तिघे रा.बोरखळ ता सातारा) असे शिक्षा सुनावण्यात आलेल्या आरोपीचे नावे आहेत. राजेश नामदेव पाटील (वय ४०, रा.बोरखळ) असे खून झालेल्याचे नाव असून याप्रकरणी मच्छिंद्र नारारण पाटील (वय ४८) यांनी सातारा तालुका पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती.

भुईमुगाच्या शेतात शेळ्या गेल्या झाला वाद! 

तक्रारदार मच्छिंद्र पाटील यांनी दि.२८ जून २०१६ रोजी दुपारी ०२.३० वाजता बोरखळ मधील कोळकीचा माथा येथे शेळ्या चारत असतांना संजय रसाळ यांच्या मालकीच्या भुईमुगाच्या शेतात बक-या गेल्या. आणि या कारणातून पाटील रसाळ यांच्यामध्ये वाद झाला या वादातून पाटील यांना काठीने मारहाण झाली. या वादानंतर मच्छिंद्र पाटील घरी जात असताना त्यांचा पुतण्या राजेश पाटील यांना भेटला असता मारहाण झाल्याचे त्यांना समजले. यामुळे पाटील कुटुंबिय मारहाणीबाबतचा जाब विचारण्यासाठी रसाळ यांच्याकडे गेले.


 याचवेळी चौकात संशयितांनी हत्यारासह राजेश पाटील यांच्यावर हल्ला चढवला. या हल्ल्यात राजेश यांच्या पाठीवर, पोटावर वार झाल्याने ते रक्ताच्या थारोळ्यात पडले व जागीच त्यांचा मृत्यू झाला. या घटनेची माहिती सातारा तालुका पोलिसांना समजल्यानंतर त्यांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. 


खूनाचा गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपींना अटक करण्यात आली. या घटनेचा तपास सहायक पोलीस निरीक्षक सुनील जाधव यांनी करुन जिल्हा न्यायालयात दोषारोपत्र दाखल केले. न्यायालयात दोन्ही पक्षाचा युक्तिवाद ऐकून न्यायाधिशांनी तिन्ही भावांना जन्मठेप व प्रत्येकी ५ हजार रुपये दंड. तो दंड न भरल्यास ३ महिने साधा कारावासाची शिक्षा ठोठावली. सरकार पक्षातर्फे अॅड.मिलिंद ओक यांनी काम पाहिले. प्रॉसिक्युशन स्कॉडचे पोलीस हवालदार भोसले सह पूर्णा यादव, घाडगे यांनी सहकार्य केले.

जाहिरात

Suvidha Online Raver


 


SuvarDip News Android App
⬆️ येथे क्लिक करून Download करा ⬆️