तंबाखू, सुगंधित सुपारी, पान मसाला,यावर सार्वजनिक ठिकाणी सेवन अथवा विक्रीस बंदी ; तंबाखू नियंत्रण पथकामार्फत भोकर येथे 24 विक्रेत्यांवर कारवाई

नांदेड - भोकर तालुक्याच्या ठिकाणी तंबाखू आणि तंबाखूजन्य पदार्थाची सरार्स विक्री होत असल्याचे जिल्हाप्रशासनाच्या लक्षात येताच त्यांनी धाडी टाकून 24 तंबाखू विक्रेत्यांकडून 31 हजार 50 रूपयाचा दंड वसूल केला. सार्वजनिक ठिकाणी कोणत्याही प्रकारचे तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थ सेवन व विक्री करण्यास प्रतिबंध घालण्यात आला आहे.
[ads id="ads1"]
शासन निर्णयानुसार सार्वजनिक ठिकाणी कोणत्याही प्रकारचे तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थ सेवन किंवा धुम्रपान अथवा विक्री करता येत नाही. केवळ तंबाखू साठी नव्हे 
[ads id="ads2"] तर सुगंधित सुपारी, पान मसाला, खुला तंबाखू व धुम्रपान यासाठी लागू आहे.खाण्यापिण्याच्या गोष्टी विक्रीच्या ठिकाणी तंबाखू असलेली कोणतीही गोष्ट विकण्यास मनाई करण्यात आली आहे.तंबाखू विक्रीसाठी परवाना लागत असून सदर परवाना धारक ठिकाणी कोणत्याही प्रकारचे खाद्यपदार्थ किंवा पेय विक्री करता येत नाही.उल्लंघन करणाऱ्यांवर विविध कायदा तसेच त्यातील विविध कलमान्वये कार्यवाही करता येईल.

 जिल्हा शल्यचिकित्सक निलंकठ भोसीकर, नोडल अधिकारी डॉ.हनुमंत पाटील यांच्या मार्गदर्शनात करण्यात आली.या पथकात जिल्हा सल्लागार डॉ.साईप्रसाद शिंदे, मानसशास्त्रज्ञ प्रकाश आहेर, ग्रामीण रूग्णालय भोकर येथील वैद्यकीय अधीक्षक डॉ.अशोक मुंढे, दंतशल्य चिकित्सक डॉ.राजाराम कोळेकर, पोलिस निरीक्षक विकास पाटील याची उपस्थिती होती.

सार्वजनिक ठिकाणी अथवा शैक्षणिक शासकीय कार्यालयाच्या परिसरात तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थाची विक्री अथवा सेवन किंवा साठवण होत असल्यास जिल्हा तंबाखू नियंत्रण कक्ष येथे तक्रार नोंदवून जिल्हा तंबाखू मुक्त करण्यास सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.निलंकठ भोसीकर यांनी केले आहे.

जाहिरात


Suvidha Online Raver


 


SuvarDip News Android App
⬆️ येथे क्लिक करून Download करा ⬆️