Suvarn Dip Impact News : अखेर अवैध तांदूळ वाहतूक करून बाजारात नेणाऱ्या 4 जणांविरुद्ध गुन्हा दाखल. ; 2 जणांना अटक तर प्रमुख सूत्रधार फरार. यावल पोलिसांच्या सतर्कतेमुळे रेशन रॅकेट उघड

[ads id="ads2"]
यावल वार्ताहर (सुरेश पाटील) गोंदिया येथे जाणारा 30 टन तांदुळाचा ट्राला यावल पोलिसांनी पकडला असे वृत्त सर्वात प्रथम   Suvarndip Digital News ला प्रसिद्ध झाले होते त्यानंतर दिनांक 26 रोजी अन्य वृत्तपत्रात प्रसिद्ध झाले आणि याबाबत यावल पोलिसांनी चौकशी करून आज दि. 27 बुधवार रोजी यावल पोलीस स्टेशनला चार संशयित आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला 
[ads id="ads1"]
यातील 2 आरोपींना अटक करण्यात आली असून चोपडा येथील संशयित मुख्य सूत्रधार पंकज मुरलीधर वाणी यांस लवकरच अटक होणार असल्याने चोपडा,यावल,रावेर तालुक्यासह संपूर्ण जळगाव जिल्ह्यातील स्वस्त धान्य दुकानदारानं मध्ये तसेच पुरवठा विभागात एकच खळबळ उडाली आहे.संबंधित मुख्य सूत्रधाराने शासनाचा शिधापत्रिकेवर वितरित होणारा तांदूळ कुठून आणि कोणा कोणा जवळून कोण कोणत्या गावातून कोणकोणत्या रेशन दुकानदाराच्या नावाने किंवा दुकानातून संकलित केला आहे शिधापत्रिका धारकांना रेशनिंग तांदूळ विक्री तथा वितरित करून रेशन दुकानात कॅश मेमोवर ग्राहकांची स्वाक्षरी घेतलेली आहे किंवा नाही,संबंधित तहसीलदार, दक्षता समिती,पुरवठा विभाग, पुरवठा निरीक्षक यांनी दुकान चौकशी व भेटीदरम्यान काय चौकशी केली आहे किंवा नाही? याबाबतची सखोल चौकशी यावल पोलिसांनी केल्यास चोपडा तालुक्यातील रेशन मालाचे फार मोठे रॅकेट उघडकीस आल्याशिवाय राहणार नाही असे सर्वत्र बोलले जात आहे.
          याबाबत यावल पोलिसांनी दिलेली माहिती माहिती अशी की सहाय्यक फौजदार मुजफ्फर खान समशेर खान यांनी फिर्याद दिली की दि.23ऑक्टोंबर 2021 रोजी मी व माझे सहकारी पोलिस हेडकॉन्स्टेबल असलम खान, पो.कॉ.सुशिल घुगे,चालक गणेश रोहिल व इतर पोलिस पोलीस स्टेशनला हजर असताना पोलीस निरीक्षक सुधीर पाटील यांनी त्यांचे दालनात बोलावून त्यांना मिळालेल्या गुप्त बातमी नुसार शासनाचा शिधापत्रिकेवर वितरित होणारा तांदूळ काळ्याबाजारात जास्त दराने विक्री करण्यासाठी ट्रक क्र. एम. एच. 18 ए.सी. 0847 हे वाहन कापडणे येथून चोपडा यावल मार्गाने गोंदिया येथे जात आहे त्याच्यावर कायदेशीर कार्यवाही करा असे सांगितले त्यावरून आम्ही पोलीस स्टॉप शासकीय वाहनाने यावल चोपडा रोडवर हॉटेल केसरबाग जवळ जाऊन येणारे जाणारे वाहनाची खात्री करत असताना चोपडा कडून ट्रक (ट्राला) क्र.एम.एच.18 ए.सी.0847 यावल कडे येताना दिसला सदरचा ट्रक थांबवून ड्रायव्हर यास त्याचे नाव गाव विचारता त्याने त्याचे नाव केदार मुरलिधर गुरव वय 38धंदा ड्रायव्हर राहणार आकाश गार्डन समोर शहादा रोड शिरपूर जिल्हा धुळे असे सांगितले त्यास विश्वासात घेऊन वाहनातील धान्या बाबत विचारपूस करता त्यांनी सांगितले की वाहनातील तांदूळ मी आज रोजी चोपडा येथील पंकज मुरलीधर वाणी (रेशन मालाचा तांदळाचा मुख्य सूत्रधार)यांनी सांगितले वरून कापडणे येथील संतोष प्रभाकर पाटील निलेश राजेंद्र जैन दोन्ही राहणार कापडणे यांचे कापडणे कठवळ रोड वरील कल्याणी फिनाईल इंडस्ट्रीज येथील गोडाऊन मधून एकूण 30 टन वजनाचा तांदूळ बाजारभावातील अंदाजे किंमत 5 लाख 88 हजार 243 रुपयाचा तांदूळ भरून तो चोपडा येथे आणलेला असून व त्यांनी सांगितल्याप्रमाणे वर नमूद तांदूळ मी हिरा ट्रान्सपोर्ट चोपडा यांचेमार्फत गीतिका पराबोलिक इंडस्ट्रीज गोंदिया येथे जात आहे त्यास वाहनातील तांदूळ हा रेशनिंगचा तांदूळ असून आपण तो कसा वाहनात भरला आहे.
  याबाबत तो काही एक समाधानकारक उत्तर न देता उडवाउडवीची उत्तरे दिल्याने सदरचा ट्रक यावल पोलीस स्टेशन आवारात थांबवून यावल तहसीलदार यांना वाहनातील तांदूळ हा शासनाचा शिधापत्रिकेवर वितरित होणारा तांदूळ आहे अगर कसे याबाबत पत्र लिहून आम्ही सुद्धा पोलीस निरीक्षक सुधीर पाटील यांचे मार्गदर्शनाखाली सदर तांदूळ बाबत समांतर चौकशी करीत असल्याने दि.24/10/2021 चोपडा येथील रोहित ट्रेडिंग कंपनी चोपडा येथील मालक पंकज मुरलीधर वाणी यांनी पत्राद्वारे कळविले की आपण ताब्यात घेतलेले वाहनातील मालक मी म्हणजे पंकज मुरलीधर वाणी असून सदर चा तांदूळ हा जोगाई किराणा स्टोअर्स कापडणे तालुका जिल्हा धुळे यांचेकडून मी खरेदी करून तो गीतिका पराबलीं ग इंडस्ट्रीज,फुलचुर रोड गोंदिया येथे चोपडा येथील हीरा ट्रान्सपोर्ट यांचेमार्फत पाठवीत आहे. 
  त्यावरून यावल पोलिसांनी दि. 26/10/ 2021रोजी कापडणे येथील कापडणे कठवळ रोड वरील कल्याणी फिनाईल इंडस्ट्रीज येथे व जोगाई किराणा या ठिकाणी जाऊन जोगाई किराणा स्टोअरचे मालक संतोष प्रभाकर पाटील यांना कल्याणी फिनाईल इंडस्ट्रीज कापडणे येथे चौकशी केली असता सदर चौकशीत त्यांनी सांगितले की मी व निलेश राजेंद्र जैन राहणार कापडणे असे शिधापत्रिकाधारक दुकानदारांकडून शासनाचा रेशनिंगचा तांदूळ खरेदी करून तो याठिकाणी गोडाऊनमध्ये साठा करून साठा झाल्यावर सदरचा तांदूळ काळ्याबाजारात जास्त दराने व्यापारी यांना विकतो. त्याप्रमाणे मागील 2 ते 3 महिन्यापासून आमचे संपर्कात चोपडा येथील पंकज मुरलीधर वाणी आले व तुम्ही रेशनिंगचा तांदूळ गोडाउन मध्ये साठा करून ठेवा तो साठा 20 ते 30 टन येवढा झाल्यावर तो तांदूळ आम्ही तुमच्या कडून खरेदी करू व तांदूळ घेण्यासाठी आम्ही ड्रायव्हर व ट्रक तुमच्या गोडाऊनला पाठवू असे सांगितले त्यावेळी आम्ही त्यास सांगितले की आम्ही तुम्हाला देत असलेला तांदूळ हा शासनाचा शिधापत्रिकेवर वितरित होणारा रेशनिंगचा तांदूळ आहे काही अडचण आल्यास त्याला कोण जबाबदार त्यावेळी तुम्ही ती चिंता करू नका मी सर्व पाहून घेईल असे सांगितले त्यानंतर महिन्याकाठी आम्ही त्यास तीन ट्रक प्रत्येकी 25 ते 30 टन तांदुळाने भरलेले पाठवीत असून आज पाहतो आम्ही त्यांना 160 ते 170 टन तांदूळ ट्रकमध्ये भरून पंकज मुरलीधर वाणी यांना पाठविला असून दिनांक 23 ऑक्टोंबर 2019 रोजी सुद्धा त्यांनी पाठविलेल्या वरील ट्रक क्र. मध्ये एकूण तीस टन तांदूळ भरून ड्रायव्हर केदार मुरलीधर गुरव यांचे मार्फत पाठविला आहे सदर चौकशीत कल्याणी फिनाईल इंडस्ट्रीज गोडाऊन कापडणे या ठिकाणची पाहणी करता गोडाऊनमध्ये महाराष्ट्र शासनाचा रेशनिंग धान्य विक्री चा सिम्बॉल असलेली व महाराष्ट्र शासन व खरीप हंगाम व देण्याचा प्रकार तांदूळ असे शासकीय प्रिंटिंग प्रेसमध्ये प्रिंट केलेले व फक्त शासनाच्या धान्य वितरित प्रणाली करता वापरले जाणारे असे मिळते जुळते वर्णन असलेले एकूण 25 न बारदान प्रत्येकी 50 किलो मापाचे रिकामे वरदान दिसून आले आहे.   
  तसेच त्यांच्याकडे धान्य खरेदी विक्री करण्याचा कोणताही परवाना नसून तसेच त्यांचे कडे अगर त्या ठिकाणी स्टॉक रजिस्टर इत्यादी मिळून आलेले नाही त्यावरून वरील वाहनातील तांदूळ हा शासनाचा शिधापत्रिकेवर वितरित होणारा रेशनिंगचाच तांदूळ असून वर नमूद आरोपीतानी संगनमत करून तो वरील वजनाचा व किमतीचा तांदूळ काळ्याबाजारात जास्त दराने विक्री करण्यासाठीच नेत असले बाबत पोलिसांची खात्री झाली म्हणून यावल पोलीस स्टेशनला चोपडा येथील पंकज मुरलीधर वाणी कापडणे येथील निलेश राजेंद्र जैन कापडणे येथील संतोष प्रभाकर पाटील तसेच शिरपूर येथील केदार मुरलीधर गुरव यांच्याविरुद्ध जीवनावश्यक कायदा कलम 3 व 7 प्रमाणे कायदेशीर कारवाई करून गुन्हा दाखल करण्यात आला तसेच निलेश राजेंद्र जैन संतोष प्रभाकर पाटील या दोन जणांना अटक करण्यात आली आहे यातील मुख्य सूत्रधार पंकज मुरलीधर वाणी तसेच केदार मुरलीधर गुरव यांचा यावल पोलीस शोध घेत असून मुख्य सूत्रधार फरार झाले आहेत का?त्यांना अटक केव्हा होणार?पोलिसांनी सखोल चौकशी केल्यास तसेच चोपडा तालुक्यातील सर्व रेशनिंग दुकानदारांचे कॅश मेमो ची तपासणी केल्यास 90 टक्के दुकानदारांकडे स्वस्त धान्य दुकानातून रेशन धान्य घेणाऱ्या ग्राहकांच्या स्वाक्षरी आढळून येणार नाहीत असा मोठा पुरावा पोलिसांच्या हाती लागेल याबाबत चोपडा यावल तालुक्यात सह संपूर्ण जळगाव जिल्ह्यात महसूल,पुरवठा विभागासह स्वस्त धान्य दुकानदाराचे लक्ष वेधून आहे पुढील तपास पोलिस निरीक्षक सुधीर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली यावल पोलीस करीत आहेत.

रेशन धान्य मालाचा काळाबाजार करणाऱ्याच्या स्थावर व जंगम मालमत्तेची चौकशी केल्यास फार मोठे रॅकेट उघडकीस येणार - सुरेश पाटील

रेशन धान्य माल काळ्याबाजारात विक्री करणाऱ्यां ज्या काही स्वस्त धान्य दुकानदारावर आणि इतर संबंधितांवर गुन्हे दाखल झालेले आहेत अशा आरोपींची आणि त्यांना मदत करणाऱ्या काही अधिकारी,कर्मचाऱ्यांच्या स्थावर व जंगम मालमत्तेची तसेच बॅंकेतील खातेऊतारे व आर्थिक उलाढाल याची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लाच लुचपत व आयकर विभागामार्फत चौकशी केल्यास जळगाव जिल्ह्यासह संपूर्ण राज्यात रेशनिंग धान्य मालावर तसेच विविध शासकीय योजनांच्या माध्यमातून व शासकीय कामकाज करताना गैरप्रकार भ्रष्टाचार करून दरवर्षी शासकीय विवरण पत्र न भरणाऱ्या आणि बनावट दस्तऐवज सादर करून गर्भश्रीमंत झालेल्यांची फार मोठी यादी जनतेसमोर आल्या शिवाय राहणार नाही असे बोलले जात असून याबाबत नाशिक विभागात विशेष करून जळगाव,धुळे जिल्ह्यातील पाच ते सहा व्यापाऱ्यांनी गेल्या वीस ते पंचवीस वर्षात कोट्यावधी रुपयाची माया कशी जमवली आहे याबाबत पुराव्यानिशी लेखी तक्रारी असल्याने संबंधित यंत्रणा काय कारवाई करणार आहे किंवा नाही याबाबत जळगाव जिल्ह्यात भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलन न्यास जळगाव जिल्हा संघटक तथा भारतीय जन संसद जळगाव जिल्हाध्यक्ष सुरेश पाटील यांची संबंधित यंत्रणेकडे लेखी स्वरूपात तक्रार असल्याने जबाबदार अधिकाऱ्यांनी कार्यवाही न केल्यास त्यांच्याविरुद्ध रीतसर कर्तव्यात कसूर व शिस्तभंगाची कार्यवाही करण्याची मागणी केली जाईल तसेच वेळेप्रसंगी न्यायालयात प्रकरण दाखल करून न्याय मिळण्याची मागणी जाईल असे सुद्धा सुरेश पाटील यांनी सांगितले आहे.

जाहिरात

Suvidha Online Raver


 


SuvarDip News Android App
⬆️ येथे क्लिक करून Download करा ⬆️