जगप्रसिद्ध असलेल्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म Facebook च्या नावात बदल ; भारतात फेसबुक वापरणाऱ्यांची संख्या 41 कोटी (काय आहे Facebook चे नवीन नाव)

[ads id="ads2"]
आंतरराष्ट्रीय - Facebook चे नाव हे 2005 साली बदलण्यात आले होते तर आता पुन्हा 2021 ला बदलण्यात आले आहे तर सोशल मीडिया प्लॅटफॉर्म फेसबुकने आपल्या कंपनीचे नाव बदलून ‘Meta’ केले आहे. गेल्या अनेक दिवसांपासून फेसबुक नवीन नावाने रिब्रँड करण्याचा विचार करत होते
[ads id="ads1"] तर अखेर फेसबुकने कंपनीचं नाव बदललं आहे. पण असं असलं तरी फेसबुकच्या मालकीच्या स्वतंत्र प्लॅटफॉर्मची नावे कायम राहणार आहेत.

कंपनी केवळ सोशल मीडिया कंपनीपासून “मेटाव्हर्स कंपनी” बनणार आहे आणि “एम्बेडेड इंटरनेट” वर काम करेल, जे वास्तविक आणि आभासी जग एकत्र करेल, असं फेसबुकचे मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) मार्क झुकेरबर्ग यांनी जाहीर केले आहे.

Facebook माजी सिविक इंटिग्रिटी चीफ समिध चक्रवर्ती यांनी कंपनीला ‘मेटा’ हे नाव सुचवले होते. यापूर्वी फेसबुकने 2005 मध्ये असेच काही केले होते, जेव्हा त्याने आपले नाव TheFacebook वरून Facebook असे बदलले होते. जगभरात 3 अब्जाहून अधिक लोक फेसबुक वापरतात. त्याचवेळी, भारतात फेसबुक वापरणाऱ्यांची संख्या 41 कोटी आहे.

Facebook आणि इतर मोठ्या कंपन्यांसाठी ‘मेटाव्हर्स’ ही संकल्पना उत्साहवर्धक आहे कारण ती नवीन बाजारपेठा, नवीन प्रकारचे सोशल नेटवर्क्स, नवीन ग्राहक इलेक्ट्रॉनिक्स आणि नवीन पेटंटसाठी संधी निर्माण करेल, अशा मार्केटमध्ये आशा आहेत.

कंपनीने नाव जाहीर करताना मेटाव्हर्सची नेमकी काय असेल आणि ती प्रत्यक्षात कशी आणली जाईल याची योजना देखील सगळ्यांसमोर मांडली आहे. मेटाव्हर्स हे एक पूर्णतः ऑनलाईन विश्व असेल ज्या ठिकाणी व्हर्च्युअल वातावरणात आपल्याला ऑनलाईन गेम्स खेळता येऊ शकतील, काम करता येऊ शकेल त्याच बरोबर संभाषण देखील साधता येईल.

ऑनलाइन सुरक्षिततेबाबत अनेक देशांमध्ये कंपनीवर प्रश्न उपस्थित होत असताना, प्रक्षोभक मजकूर थांबत नसताना फेसबुकने हे नाव बदलले आहे. भारत सरकारने फेसबुकला पत्र लिहून सोशल मीडिया कंपनीद्वारे वापरल्या जाणार्‍या अल्गोरिदम आणि प्रक्रियांचा तपशील मागवला आहे.
 

जाहिरात

Suvidha Online Raver


 


SuvarDip News Android App
⬆️ येथे क्लिक करून Download करा ⬆️