अलिबाग,जि.रायगड - निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क भरारी पथक, महाराष्ट्र राज्य, मुंबई या पथकास मिळालेल्या गोपनीय खबरीनुसार दि.06 ऑक्टोबर 2021 रोजी केलेल्या कारवाईमध्ये कोनेक्स टर्मिनल प्रा.लि.(CFS) कंपनीच्या गेटच्या बाहेरील बाजूस असणाऱ्या रस्त्याच्या बाजूला, भेंडखळ ता. उरण जि. रायगड या ठिकाणी विनापरवाना मळीची अवैध वाहतूक करणारे
[ads id="ads1"]
04 टँकर तसेच पुढील तपासामध्ये कोनेक्स टर्मिनल प्रा.लि. (CFS) कंपनीच्या गेटच्या आतील बाजूस मळीने भरलेले दोन टँकर तसेच या टँकरमधून कंटेनरमध्ये मळीसाठा काढण्याकरिता वापरण्यात आलेला शिवाय कंपनीचा एक 5 एच.पी. चा मोठा थ्री फेज इंडक्शन मोटर पंप जप्त केला आहे.
या प्रकरणी केलेल्या तपासामध्ये कोणत्याही टँकर चालकांकडे तसेच याठिकाणी उपस्थित असलेल्या निर्यातदाराकडे मुंबई मळी नियम 1955 मधील तरतुदीनुसार मळी आयात करणे, निर्यात करणे, विक्री करणे व जवळ बाळगणे तसेच महाराष्ट्र थेट वाहतूक पास नियम, 1997 मधील तरतुदीनुसार लागणारा कोणताही
[ads id="ads2"] शासकीय वैध परवाना नसल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे या टँकरचालक व निर्यातदार यांच्याकडे केलेल्या चौकशीमध्ये त्यांनी ही विनापरवाना मळी हरियाणा राज्यातून महाराष्ट्र राज्यात बेकायदेशीररित्या आणल्याचे तपासात उघड झाले.
यामुळे या प्रकरणी 06 टँकरचालक व 01 मळी निर्यातदार असे एकूण 06 आरोपीना अटक करून त्यांच्या ताब्यातून एकूण रुपये 01 कोटी 09 लाख 86 हजार 795 इतक्या किमतीचा मुद्देमाल पंचासमक्ष सहा मळी टँकरसह जप्त करण्यात आला आहे.
या प्रकरणी अटक व संशयित आरोपीच्या विरोधात महाराष्ट्र दारुबंदी कायदा 1949 चे कलम 61 (1) 70, 80 (2), 81, 83, 90 व 103 अन्वये कारवाई करून गुन्हा रजि. क्र. 360/2021 दि. 06 ऑक्टोबर 2021 ची नोंद करण्यात आली आहे.
या कारवाईदरम्यान जप्त केलेल्या मुद्देमालाची माहिती पुढीलप्रमाणे:-
14 चाकी टँकर-NL 01-AE-4243 व त्यामधील 27.245 मे.टन मळी, 14 चाकी टँकर क्र. NL 01-AC-3973 व त्या मधील 28.735, मे.टन मळी, 12 चाकी टँकर, MH-04-GC-6065 व त्यामधील 23.725 मे. टन मळी, 12 चाकी टँकर क्र.-MH-43-V-0445 व त्या मधील 24.230 मे.टन मळी,14 चाकी टँकर- क्र. RJ - 29 - GA - 7135 व त्यामधील 30.070 मे.टन मळी, 16 चाकी टँकर-क्र RJ29-GA-8729 व त्या मधील 34.260 मे.टन मळी असे 6 टँकरमधील एकूण जप्त मळी 168.265 मे.टन., इतर जप्त मुद्देमाल एक 5 एच.पी. थ्री इंडक्शन मोटर पंप, 10 फूट 3 इंची पाईपसह, आरोपी क्र. 04 याच्या ताब्यात मिळून आलेला विवो कंपनीचा एक मोबाईल. मुद्देमालाची एकूण किंमत 01 कोटी 09 लाख 86 हजार 795
या गुन्ह्यातील आरोपींची नावे पुढीलप्रमाणे :- 1)अवनीशकुमार भूमिकाप्रसाद पाल, वय 39 वर्ष वाहन क्र.NL-01-AE-4243 चा चालक रा. मु.पो. हरिहरगंज, संदोरा, प्रतापगढ, उत्तरप्रदेश 2303042. 2) नवलकुमार श्रीदिलीप निराला, वय 45 वर्ष वाहन क्र. NL-01-AC-3973 चा चालक रा.मु.पो. 43/बी.बी. बोस रोड, हावडा पश्चिम बंगाल. 3) राजीतराम कालिका प्रसाद गोड, वय 27 वर्ष वाहन क्र.MH-04-GC-6065चाचालक रा.मु.पो. भागवा भीट पी.एस., पुरा कलंदर, फैजलवाद, अयोध्या, उत्तरप्रदेश. 4) राहुल नरेंद्रभाई अर्ध्वय, वय 41 वर्ष,रा.मु.पो. 304/ओ. साईपूजन रेसिडन्सी, ओल्ड कोसाड, चारोसी अपोलो, मनिषा चौक, ता. जि. सूरत, गुजरात-394107. 5) विश्राम रंगलाल मीना, वय 52 वर्ष,वाहन क्र.RJ-29-GA-7135 चा चालक, रा. मु. पो. दुल्लावा, ता.बैजूपाडा, जि.दौसा, राजस्थान. 6) जगदीश प्रसाद छुटन लाल मोना, वय 55 वर्ष, वाहन क्र. RJ - 29 - GA - 8729 चा चालक रा.मु. मोजपूर पो. पिपलखेडा, ता. महुवा जि. दौसा, राजस्थान. 7) राजेशसिंग दिवानसिंग ठाकूर, वाहन क्र. MH-43-V-0445 चा चालक, साईबाबा मंदीराजवळ, सी-25 ओम गणेशनगर, वाशी नाका, माहुल रोड चेंबूर, मुंबई.
या गुन्हयातील सर्व आरोपीना प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी, उरण, जि. रायगड यांनी आरोपी अ. क्र. 01 ते 03 व 05 ते 07 यांना दि.09 ऑक्टोबर 2021 रोजीपर्यंत व आरोपी क्र. 04 यास दि.11 ऑक्टोबर 2021 रोजीपर्यंत रोजीपर्यंत पोलीस कोठडी मंजूर केली आहे.
ही कारवाई कांतिलाल उमाप, आयुक्त, राज्य उत्पादन शुल्क, महाराष्ट्र राज्य मुंबई यांच्या आदेशानुसार व श्रीमती उषा वर्मा, संचालक (अ.व.द.) राज्य उत्पादन शुल्क, महाराष्ट्र राज्य, मुंबई व श्री. सुनिल चव्हाण, विभागीय उप-आयुक्त कोकण विभाग, ठाणे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली असून या कारवाईमध्ये निरीक्षक श्री.संताजी लाड व श्री.मनोज चव्हाण तसेच दुय्यम निरीक्षक श्री.पी.एस. कांबळे,
श्री.पी.जी दाते, श्री योगेश पाडळे, तसेच जवान सर्वश्री अमोल चिलगर, रविंद्र पाटील, अमोल हिप्परकर सोमनाथ पाटील, धनाजी दळवी, सुभाष रणखांब, विकास चिंदरकर, श्रीराम राठोड यांनी प्रत्यक्ष भाग घेतला. या कारवाईवेळी श्री. रविंद्र पाटणे, निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, भरारी पदक, पनवेल. जि. रायगड यांनी त्यांच्या स्टाफसह घटनास्थळी उपस्थित राहून गुन्हा नोंद करण्याकामी सहकार्य केले. या गुन्ह्याची फिर्याद श्री पी. एस. कांबळे, दुय्यम निरीक्षक यांनी दिली आहे तर पुढील तपास श्री. मनोज चव्हाण, निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, भरारी पथक महाराष्ट्र राज्य मुंबई हे करीत आहेत.
अवैध मद्य निर्मिती, विक्री, वाहतूक या संदर्भात कोणतीही तक्रार असल्यास या विभागाच्या टोल फ्री क्रमांक 1800 833 3333 व व्हॉटस अॅप क्र. 8422001133 तसेच दूरध्वनी क्र. 022-2263881 वर संपर्क साधावा, असे आवाहनही राज्य उत्पादन शुल्क विभागाने केले आहे.