कळवण प्रतिनिधी (सुशिल कुवर )कळवण तालुक्यातील आदिवासी बहुल भागात मागील अनेक वर्षांपासून बंद असलेली बस सेवा शालेय वेळेत पुर्ववत सुरू करणे संदर्भात आदिवासी शक्ती सेना महाराष्ट्र राज्य च्या कार्यकर्त्यांनी, राज्य परिवहन महामंडळाच्या कळवण आगार प्रमुखांना दिले निवेदन.
[ads id="ads1"]
तालुक्यातील रस्त्यांची झालेली दुरावस्था, ठिकठिकाणी रस्त्यांवरील मोठमोठे खड्डे व अरुंद रस्त्यांमुळे अपघाताचे प्रमाण वाढले असल्याने तालुक्यातील काही मार्गावरील बस सेवा या बंद तर काही इतर मार्गे वळविण्यात आल्या आहेत, तसेच
[ads id="ads2"] मागील नऊ महिन्यांपासून जगभरात सुरू असलेल्या कोविड-19 रोगाच्या साथीमुळे संपूर्ण देश व राज्यात बस सेवा ही बंद करण्यात आली होती.
मात्र सध्या कोवीडच्या विळख्यातून देशातील परिस्थिती ही सुधारत असून जनजीवन पूर्वपदावर येत आहे. शासनाने आठवडे बाजार, शासकीय कार्यालये, शाळा- महाविद्यालये चालु केले मात्र ग्रामीण भागातील विद्यार्थ्यी, प्रवासी यानां दळणवळणाची सुवीधा उपलब्ध नसल्याने मोठे मनस्ताप सहन करावे लागत आहे.
तालुक्यातील खराब रस्ते एसटी वाहतूकीसाठी काही प्रमाणात सुयोग्य झाले असून या मार्गावरील बंद असलेली कळवण ते कोसवन तसेच नांदुरी ते अभोना बस सेवा ही सुरू करुन तालुक्यातील ग्रामीण जनतेला दिलासा द्यावे या आशयाचे निवेदन आदिवासी शक्ती सेना चे तालुकाध्यक्ष कृष्णा पवार, सरचिटणीस सुदाम भोये, उपसचिव पुंजाराम खांडवी, विशाल गांगुर्डे, दिपराज महाले, रवी बहीरम, पुरुषोत्तम गावित आदीसह पदाधिकारी यांनी कळवण आगार व्यवस्थापक हेमंत पगार यांना दिले.