बीड - सत्तेत आल्यानंतर ओबीसींची जातनिहाय जनगणना करू असे जाहीरनाम्यात नमूद असताना केंद्रातील मोदी सरकारने ओबीसींना दिलेला शब्द पाळला नसल्याची टीका वंचित बहुजन आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा रेखाताई ठाकूर यांनी केली. बीड येथे आयोजित कार्यकर्ता संवाद, समीक्षा, संघटन आढावा मेळाव्यात त्या बोलत होत्या. यावेळी मंचावर प्रदेश प्रवक्ते फारूख अहमद, प्रदेश उपाध्यक्ष गोविंद दळवी, महिला आघाडीच्या प्रदेश महासचिव अरुंधती शिरसाठ, प्रदेश उपाध्यक्ष सविताताई मुंडे, मराठवाडा अध्यक्ष अशोक हिंगे पाटील, ज्येष्ठ नेते विष्णु जाधव, मराठवाडा महासचिव रमेश गायकवाड, विष्णू देवकाते बीडचे जिल्हाध्यक्ष अनिल डोंगरे, भगवंत वायबसे, सचिन मेधडंबर, युवा जिल्हाध्यक्ष निलेश साखरे, बबन वडमारे, संतोष जोगदंड, नितीन सोनवणे, बालाजी जगतकर, लातूरचे जिल्हाध्यक्ष जगदीश माळी, औरंगाबादचे महानगराध्यक्ष संदीप शिरसाठ आदी मान्यवरांची उपस्थिती होती.
[ads id='ads1]
याप्रसंगी पुढे बोलताना रेखाताई ठाकूर म्हणाल्या की मागील सत्तर वर्षाच्या काळात ज्या ज्या पक्षांनी राज्यावर सत्ता गाजवली त्यातील एकही पक्षाने मराठवाड्याच्या विकासासाठी ठोस पावले उचलली नाहीत. मराठवाडा परिसरात मोठ्या प्रमाणावर पाण्याचा दुष्काळ, बेरोजगारी, उद्योग धंद्यांचा अभाव दिसून येते.या भागातील अनेक मंत्री,झाले परंतु यांच्याकडे धोरणच नाही केवळ जाती पातीचे राजकारण करण्यात आले यामुळे मराठवाडा विकासापासून कोसो दूर आहे. याला पर्यायी विकासाचे व्हिजन वंचित बहुजन आघाडीकडे असल्याचे याप्रसंगी त्या म्हणाल्या. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे राज्यातील पाच जिल्ह्यातील
जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणूक प्रक्रिया स्थगित करण्यात आले आहेत, रुग्ण संख्या घटल्याने त्या प्रक्रियेस गती मिळावी, याबरोबरच गत निवडणूकित जातीनिहाय जनगणना करण्याचा जो शब्द केंद्र सरकारने दिला तो पाळला नाही. मराठवाड्यात मोठ्या प्रमाणात काही दिवसात पाऊस झाला आहे त्यामुळे शेतकरी अडचणीत आला आहे सत्ताधारी पक्षातील मंत्री बांधावर जाऊन फोटोसेशन करत आहे ते प्रत्यक्ष बांधावर जाऊन शेतकर्यांना आर्थिक मदत करावी व गत वर्षी चा विमा देखील शेतकरी तात्काळ द्यावा अशी मागणी यावेळी त्यांनी केली. रेखाताई ठाकूर यांनी बाळासाहेबांच्या पस्तीस वर्षाच्या राजकारणाचा तपशीलवारपणे आढावा यावेळी मांडला.
संवाद मेळाव्यास संबोधित करताना प्रदेश प्रवक्ता फारूक अहमद यांनी असे प्रतिपादन केले की महाराष्ट्रामध्ये संख्येप्रमाणे ३० ते ३५ आमदार निवडून यायला हवेत, अकरा ते बारा ठिकाणी मुस्लिम उमेदवारांना लक्षणीय मते घेऊन सुद्धा काही मतांच्या फरकाने त्यांचा पराभव झाला. मुस्लिम समाज आज ॲड प्रकाश आंबेडकर यांच्या पाठीशी आहे कारण मागील महिन्यातील पाच तारखेचा मोर्चा ॲड प्रकाश आंबेडकर यांनी आयोजित करून मुस्लिम समाजाला पाच टक्के आरक्षण देण्याबाबत शासनाकडे आग्रही मागणी केली. या आरक्षणास कोणाचाही विरोध नाही तसेच हायकोर्ट सुप्रीम कोर्टाने मान्यता दिली असताना सुद्धा महाराष्ट्र सरकार मुस्लिमांचं निर्विवाद आरक्षण त्याची अंमलबजावणी करण्यास तयार नाही म्हणून मुस्लिमांना आरक्षण मिळवायचे असेल तर प्रकाश आंबेडकर यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा रहावे लागेल.
प्रदेश उपाध्यक्ष गोविंद दळवी यांनी संघटनात्मक बांधणी ची व्याख्या सांगून कार्यकर्त्यांची कानउघडणी केली. पदापेक्षा कामाला महत्त्व द्या हे पद आज आहे उद्या नाही परंतु, पक्षाचा अजेंडा महत्त्वाचा आहे. आणि स्वतःच्या वैयक्तिक स्वार्थासाठी पक्षीय धोरणाच्या विरुद्ध जाणाऱ्यांवर कारवाई केली जाईल असेही त्यांनी सांगितले. बीड येथील मेळावा प्रचंड उत्साहात संपन्न झाला त्याची सुरुवात मोटरसायकल रॅलीने करण्यात आली होती.
यावेळी मंचावर प्रभारी अध्यक्ष रेखाताई ठाकूर यांच्यासह प्रदेश उपाध्यक्ष गोविंद दळवी प्रदेश प्रवक्ते फारूक अहमद, महिला आघाडीच्या महासचिव अरुंधती शिरसाठ, उपाध्यक्ष सविता ताई मुंडे, मराठवाडा विभागाचे अध्यक्ष अशोक हिंगे पाटील यांच्यासह बीड लोकसभेचे उमेदवार प्रा. विष्णू जाधव, विष्णू देवकते, वैभव स्वामी, रमेश गायकवाड, डॉ नितीन सोनवणे, अनिल डोंगरे, बालाजी जगतकर भगवंत वायबसे शैलैश कांबळे,अनंतराव सरवदे,संतोष जोगदंड, डॉ.गणेश खेमाडे, देविदास बचुटे,अंकुश जाधव, मिलिंद धाडगे,भारत तांगडे,सुदेश पोतदार, डॉ.सोमवशी,सचिन मेघडंबर आदींची उपस्थिती होती. मेळाव्याचे सूत्र संचलन बबनराव वाघमारे यांनी केले तर आभार प्रदर्शन भगवंत आप्पा वायबसे यांनी मानले.