सोलापूर- दिनांक 1/9/2021 सकाळची वेळ , महात्मा गांधी प्राणी संग्रहालयतील मगरीचा पिंजरा आतील झाडावर दोन घारी पतंग मांज्यात फसलेली एक घार तर मांज्यात अडकुन जमीनीपासुन अवघ्या एक फुटावर लटकत होती जी केव्हा ही मगरीची भक्ष्य बनली असती. कर्मचारी शिवानंद शिंदे सदरची घटना वन्यजीव प्रेमी संस्था सदस्यांना कळवली. संस्था सदस्य गणेश तूपदोळे,अविनाश गुदपे,सिध्देश्वर किंदगीरी.कृष्ण जंगडेकर सिद्धेश्वर मिसालेलू तेजस म्हेत्रे, यश माडे ,सुरेश करगुळे व मुकुंद शेटे घटना स्थळी पोहचले. जमिनी लगतची घार प्रथम काढण्याचा निर्णय घेण्यात आला. कर्मचारी शिंदे व गुदपे ह्यांनी पिंजरा जाळीवर चढुन बांबुच्या साह्याने घार पिंजरा बाहेर खेचली. दुसरी घार ही झाडावर तीस फुट फसलेली व तिच्या खाली बरोबर सर्व मगरी विश्रांती घेत बसल्या होत्या.
[ads id='ads1]
सोलापूर महानगरपालिका चे कदम मॅडम ह्यांना संपर्क साधुन बास्केट गाडी मागविण्यात आली. गाडी येताच बास्केट मध्ये बसुन घारीची उंची गाठण्यात आली. बांबु हुकने घार पिंजरा बाहेर काढुन पतंग मांझ्यातुन सुटका करण्यात आली. घारीच्या पंखाना बराच इजा झाल्याचे दिसुन आले. राहत संस्था चे डॉ. आकाश जाधव सरांनी दोन्ही घारीवर वैद्यकीय उपचार केले.
जखम भरुन येण्यासाठी दहा ते पंधरा दिवसाचा कालावधी लागणार समजताच सोलापूर वन विभागाचे वनपाल शंकर कुताटे ह्यांना घटनेची माहिती देण्यात आली. पुढील संगोपन वन विभागाच्या देखरेख खाली वन्यजीव प्रेमी सदस्य सिध्देश्वर मिसालोलु करित आहेत.
ही धाडसी मोहिम यशस्वी रित्या पार पाडणारे सर्व सदस्यांचे कौतुक होत आहे.