महिलेला दुचाकीवर बसवून शहरातील एका लॉजमध्ये नेले, अन् तेथे...?


जिनींग कंपनीत काम करणाऱ्या महिलेला पीडितेला गर्भधारणा झाल्याने हा प्रकार उघडकीस ; पीडितेच्या तक्रारीवरुन आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल.. 

वर्धा - जिल्ह्यातील जिनींग कंपनीत काम करणाऱ्या महिलेला आर्वी शहरातील एका लॉजमध्ये नेऊन (वय २४) वर्षीय युवक हरिष उत्तम किंदरणे याने ४० वर्षीय महिलेवर बळजबरी अत्याचार केल्याची घटना उघडकीस आल्याने आर्वी शहरात खळबळ उडाली. पीडितेला गर्भधारणा झाल्याने हा प्रकार उघडकीस आला असून याप्रकरणी आरोपीस पोलिसांनी अटक केल्याची माहिती दिली. [ads id='ads1]


हरिष उत्तम किंदरणे (वय २४) रा.आंबेडकर वॉर्ड असे आरोपीचे नाव आहे. महिला आणि आरोपी हे दोघेही आर्वी येथील एका जिनींगमध्ये कामावर होते. दोघांचीही एकमेकाशी ओळख झाली. पीडिता कामावर गेली असता 


आरोपी हरिषने महिलेला म्हणाला "तुला फिरायला नेतो" असे म्हणून दोघे दुचाकीवर बसवून शहरातील एका लॉजमध्ये महिलेला नेले तेथे तिच्यावर बळजबरीने शारीरिक संबंध प्रस्थापित केले. तसेच कॅनलमध्ये नेवून पुन्हा तिच्यावर अत्याचार केला. पीडितेवर अत्याचार करुन तिला आरोपी हरिष याने समाजात बदनामी करण्याची धमकी दिली होती. त्यामुळे पीडितेने पोलिसांत तक्रार दिली नव्हती.


 मात्र पीडिता ही आठ महिन्याची गर्भवती राहिल्याने तिला सेवाग्राम येथील रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. अखेर पीडितेच्या तक्रारीवरुन आरोपी युवक नाव - हरिष उत्तम किंदरणे विरुद्ध गुन्हा दाखल करुन त्यास पोलिसांनी बेड्या ठोकल्या

जाहिरात

Suvidha Online Raver


 


SuvarDip News Android App
⬆️ येथे क्लिक करून Download करा ⬆️