अकोला जिल्ह्यात पूरस्थिती; खापरवाडा येथील युवक वाहून गेला ; एसडीआरएफ पथकाव्दारे शोध कार्य सुरु

अकोला - मुर्तिजापूर तालुक्यातील कुरुम मंडळामध्ये 69.8 एमएम पर्जन्यमानाची नोंद झाली असून मौजे खापरवाडा येथील 28 वर्षीय नंदकिशोर तुळशीराम टापरे हे उमा नदीवरील पुलावरुन पाय घसरुन वाहुन गेले आहे. त्यांचे शोध कार्य एसडीआरएफ पथकाव्दारे सुरु आहे.
[ads id='ads1]
यासंदर्भात जिल्हा प्रशासनातर्फे देण्यात आलेल्या माहितीनुसार, अकोला तालुक्यातील सर्व नदी नाल्यांना पूर आला आहे.  काटेपूर्णा नदीमध्ये वाहुन गेलेल्या दोन मुलांचे शोध कार्य सुरु असुन त्यापैकी एका व्यक्तीचा मृतदेह मिळाला आहे व एकाचा शोध कार्य सुरु आहे. एसडीआरएफ नागपूर  पथकाव्दारे काटेपुर्णा नदीमध्ये वाहुन गेलेल्या मुलाच्या शोध कार्य सुरु आहे. ग्रांधीग्राम येथील पुर्णा नदीच्यापुलावरुन पाणी जात होते. सद्यास्थितीत अकोला-अकोट रस्ता बंद आहे. तर अकोला- म्हैसांग- दर्यापूर हा मार्ग आज दुपारपासून सुरु झाला आहे. तालुक्यात आज 18.4 एमएम पर्जन्यमानाची नोंद झाली आहे.

बार्शी टाकळी तालुक्यातही सर्व नदी नाल्यांना पूर आला आहे तथापि, कोणत्याही गावाचा संपर्क तुटल्याचे वृत्त नाही. महान येथील काटेपुर्णा मोठया प्रकल्पातुन 51.16 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरु आहे. त्यामुळे काटेपुर्णा नदीला पुर आहे. तालुक्यात आज 11 एमएम पर्जन्यमानाची नोंद झाली आहे.

अकोट तालुक्यातही सर्व नदी नाल्यांना पूर आला असून कोणत्याही गावाचा संपर्क तुटलेला नाही.  तालुक्यात आज 11 एमएम पर्जन्यमानाची नोंद झाली आहे.

तेल्हारा तालुक्यातही सर्व नदी नाल्यांना पूर आला असून  नेर, सांगवी, पिवंदळ या गावांचा संपर्क तुटला आहे. सद्यास्थितीत पुराचे पाणी कमी झाल्यामुळे पुर्वपदावर येत आहे. वान प्रकल्पातून 46.24 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरु आहे. तालुक्यात आज 18.5 एमएम पर्जन्यमानाची नोंद झाली आहे.

बाळापूर तालुक्यातही सर्व नदी नाल्यांना पूर आला असून शेगाव-निंबा अकोट या मार्गावरील अंदुरा येथे  पुलावरुन पूर्णा नदीचे पाणी वाहत असून सद्यास्थितीत रस्ता वाहतुकीसाठी सुरु आहे. हाता येथेही काही घरांमध्ये पाणी गेले आहे. तालुक्यात आज 18.5 एमएम पर्जन्यमानाची नोंद झाली आहे.

पातुर तालुक्यातही सर्व नदी नाल्यांना पूर आलेला असून कोणत्याही गावाचा संपर्क तुटल्याचे वृत्त नाही. तालुक्यात आज 6.7 एमएम पर्जन्यमानाची नोंद झाली आहे, असे कळविण्यात आले आहे.

जाहिरात

Suvidha Online Raver


 


SuvarDip News Android App
⬆️ येथे क्लिक करून Download करा ⬆️