मुंबई : आपल्या अनोख्या गोलंदाजीच्या स्टाईलमुळे आणि हेअर स्टाईलमुळे जगप्रसिद्ध झालेला श्रीलंकेचा क्रिकेटपटू लसिथ मलिंगा याने निवृत्तीची घोषणा केली आहे. मंगळवारी सोशल मीडियावर पोस्ट करत करत त्याने क्रिकेटच्या सर्व फाॅरमॅटमधून निवृत्ती घेतल्याची घोषणा केली आहे. [ads id="ads1"]
मी आता क्रिकेटच्या सर्व फॉरमॅटमधून निवृत्ती घेत आहे. माझ्या या प्रवासात ज्यांनी मला साथ दिली त्यांचे आभार, असं मलिंगाने सोशल मीडियावर म्हटलं आहे. आता मी युवा क्रिकेटपटूंसोबत आपला अनुभव शेअर करणार असल्याचं देखील मलिंगाने सांगितलं आहे.[ads id="ads2"]
याआधी मलिंगाने वनडे आणि कसोटीमधून निवृत्ती घेतली होती. मात्र त्याने टी ट्वेंटी फाॅरमॅटमधून निवृत्ती घेतली नव्हती. तो आगामी विश्वचषकानंतर निवृत्ती घेईल असं सांगितलं जात होतं. मात्र श्रीलंका क्रिकेट बोर्डाने त्याची निवड न केल्याने त्याने हा निर्णय घेतल्याचं सांगितलं जातंय.
दरम्यान, आपल्या हटके गोलंदाजीच्या स्टाईलमुळे नेहमी चर्चेत असलेल्या मलिंगाच्या नावावर अनेक आंतराष्ट्रीय रेकाँर्ड आहेत. त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 5 हाॅटट्रिक नावावर केल्या आहे. तर सलग 4 चेंडूत 4 विकेट घेण्याचा पराक्रम देखील मलिंगाने केला आहे.