अत्याचार करणाऱ्या नराधमाना जनतेसमोर फाशी द्या - सौ मनीषा पचपांडे

रावेर प्रतिनिधी (फिरोज तडवी), साकीनाका येथिल बलात्कार झालेल्या महिलेचा उपचार सुरू असतानाच मृत्यू झाल्याने सर्वत्र संतापाची लाट उसळली आहे या घटनेचा निषेध नोंदवला असून रावेर तालुका महिला सुरक्षा संघटना यांच्या कडून रावेर पोलीस निरीक्षक यांना निवेदन देण्यात आले आहे .सविस्तर माहिती अशीकी साकी नाका येथे झालेल्या अत्याचारित महिलेेचा तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, 
[ads id='ads1]

तिच्यावर राजवाडी रुग्णालयात उपचार सुरू असताना मात्र अखेर तिसऱ्या दिवशी प्राणज्योत मावळली या घटनेने संपुर्ण राज्यत पडसाद उमटले असून महिला संघटनांकडून तीव्र निषेध नोंदवला असून कायद्यात बदल घडवून कठोर अंमलबजावणी करण्यात यावी ही बाब अतिशय निंदनीय असून महिलांवर होणारे अत्याचार हे दिवसेंदिवस वाढतच आहेत या घटनेतून असे सिद्ध होतें की राज्यतील महिला सुरक्षित नाही, कारण अश्या प्रकारे अनेक घटना घडल्या आहेत, 


अश्या घटना घडल्या वर नुसत्या मेणबत्त्या जाळून व श्रद्धांजली वाहून या घटना थांबलेल्या नाहीत त्यासाठी ठोस उपाययोजना व त्वरित कायद्याची अंमलबजावणी जर झाली तर अश्या घटनांना पायबंद बसेल ज्या देशातील महिलांना देवी मानतात ,बेटी बचा ओ ,बेटी पढाओ, असे नारे देतात त्याच देशात माता व भगिनींना इज्जतीची धिंडवडे निघत आहेत.

आमच्या तिव्रभावना शासनापर्यत पोहचवयत अशी मागणी महिला सुरक्षा संघटना महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने रावेर तालुका महिला सुरक्षा संघटनेच्या वतीने रावेर पोलीस निरीक्षक यांना विविध मागण्याचे निवेदन देण्यात आले आहे सौ कल्पना दिलीप पाटील, सौ सुनीता उरेकर, भाग्यश्री पाठक, कांता युवराज बोरा, सौ शारदा चौधरी, सौ मनीषा पचपांडे यांच्या कडून करण्यात आली आहे,

जाहिरात

Suvidha Online Raver


 


SuvarDip News Android App
⬆️ येथे क्लिक करून Download करा ⬆️