ओबीसी आरक्षण परिषदेसाठी रावेरातील बैठकीत सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांचे नियोजन यशस्वी.

 


रावेर प्रतिनिंधी (राजेंद्र अटकाळे)

सध्या सरकारने राजकीय आरक्षण काढले आहे पुढे शैक्षणिक ,आर्थिक आरक्षण निघतील यासाठी ओबीसींचा लढा लढतांना सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांनी ओबीसी हीच आपली जात मानत दि.२५ सप्टेंबर रोजी जळगाव येथे होणाऱ्या ओबीसी आरक्षण परिषदेला यशस्वी करण्यासाठी पुढाकार घ्यावा असे आवाहन लोकसंघर्ष मोर्चाच्या नेत्या तथा ओबीसी आरक्षण परिषदेच्या संयोजिका प्रतिभा शिंदे यांनी रावेर येथील नियोजन बैठकीत केले.[ads id="ads1"]  

रावेर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभागृहात ओबीसी आरक्षण परिषदेच्या निमित्ताने नियोजन बैठक  राष्ट्रवादी ओबीसी सेलचे तालुकाध्यक्ष सुनील कोंडे व ऐनपुर येथील रामदास महाजन यांनी आयोजित केली होती.यावेळी अध्यक्षस्थानी जिल्हा बँकेचे माजी व्हा चेअरमन राजीव पाटील हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून लोकसंघर्ष मोर्चाच्या अध्यक्षा प्रतिभा शिंदे,जळगावचे माजी नगराध्यक्ष करीम सालार,माजी आ.अरुण पाटील,[ads id="ads2"]  जिल्हा बॅकेचे संचालक संजय पवार,जळगाव चे  एजाज गफ्फार मलिक,शिवसेना जिल्हा उपप्रमुख प्रल्हाद महाजन,केळी उत्पादक महासंघाचे अध्यक्ष भागवत पाटील,माजी नगराध्यक्ष गोटूशेठ महाजन,हरिष गनवाणी,राष्ट्रवादी किसान सभेचे जिल्हाध्यक्ष सोपान पाटील,माजी जिप सदस्य रमेश पाटील,कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती डॉ राजेंद्र पाटील,पं स सदस्य राष्ट्रवादी जिल्हा उपाध्यक्ष प्रल्हाद बोंडे, ओबीसी महासंघाचे जिल्हाध्यक्ष तथा रावेर नगरपालिकेचे नगरसेवक ऍड सुरज चौधरी, गटनेते आरिफ दारामोहम्मद,नगरसेवक कलीम शेख,सावदा नपा चे नगरसेवक सैय्यद असगर,निळे निशाण संघटनेचे आनंद बाविस्कर,राष्ट्रवादी शहराध्यक्ष शेख मेहमूद,राष्ट्रवादी अल्पसंख्यांक तालुकाध्यक्ष इम्रान खान, काँग्रेस चे तालुकाध्यक्ष ज्ञानेश्वर महाजन,सुरेश पाटील,युवक शहराध्यक्ष प्रणित महाजन,प्रदीप सपकाळे,रसलपूर सरपंच रशीद शेख,ऐनपुरचे सरपंच अमोल महाजन,वडगावचे सरपंच धनराज पाटील, संगायो,रावेर चे सदस्य राजू सवर्णे,निंभोरा येथील आशा सोनवणे,पंकज वाघ,अलतमश शेख,राष्ट्रवादी ओबीसी सेलचे मनोहर गायकवाड,प्रदीप महाजन,मयूर कोंडे,योगेश पाटील,रत्नाकर महाजन,अर्षद पिंजारी,दिलीप पाटील,किशोर पाटील,विनोद पाटील नुरा तडवी,दिलरुबाब तडवी आदी ओबीसी बांधव उपस्थित होते.यावेळी मान्यवरांनी मनोगते व्यक्त केली.

जाहिरात

Suvidha Online Raver


 


SuvarDip News Android App
⬆️ येथे क्लिक करून Download करा ⬆️