अपघातग्रस्तांचे सामाजिक कार्यकर्ता उमेश इंगळे यांनी वाचविले प्राण

 अकोला (प्रती) स्थानिक वाशिम बायपास चौकात दी.२६/०९/२०२१ रोजी संध्याकांळी माजी सैनिक मुरलीधर पातोडे व त्यांच्या मुलांचा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ वर गाडी स्लीप होऊन अपघात झाला येथे पाणी साचलेले असल्यामुळे वाहतुकीस नेहमी अडथळा निर्माण होतो, म्हणून वाहन चालकाला खूप मोठा त्रास सहन करावा लागत आहे, सदर घटना अशी की माजी सैनिक मुरलीधर पातोडे व त्यांचा मुलगा आपल्या दुचाकीवरून बाजारातुन घरी परत येत असताना वाशिम बायपास चौकात दुचाकी गाडी स्लीप होऊन त्यांचा अपघात झाला त्यांना सामाजिक कार्यकर्ता उमेश सुरेशराव इंगळे यांनी तातडीने सर्वोपचार रुग्णालयात भरती केले.[ads id="ads2"]

  पंरतु मुलाला गंभीर दुखापत झाली असल्याने आयकॉन हॉस्पिटल येथे भरती केले आहे आता दोघांचेही प्रकृती स्थिर असून उपचार सुरू आहेत सामाजिक कार्यात सदैव अग्रेसर असणारे सामाजिक कार्यकर्ता उमेश सुरेशराव इंगळे यांनी वेळेवर पोहचत रुग्णांना उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये दाखल केले त्यामुळे त्या अपघातग्रस्त बाप- लेकाचे प्राण वाचले असुन त्यांच्या नातेवाईकांनी उमेश सुरेशराव इंगळे यांचे आभार मानले.

जाहिरात


Suvidha Online Raver


 


SuvarDip News Android App
⬆️ येथे क्लिक करून Download करा ⬆️