सुवर्ण दिप न्युज च्या बातमीचा परिणाम : तामसवाडी ग्रामपंचायत घेत आहे जनसामान्यांच्या आरोग्याची काळजी

 


तामसवाडी ता.रावेर प्रतिनिधि (राजेश  रायमळे)

तामसवाडी ता.रावेर येथील ग्रामपंचायत मार्फत गावातील रस्त्यांची साफसफाई करून जनसामान्यांच्या आरोग्याची कळजी घेतली जात आहे.[ads id="ads1"]

याबाबत सविस्तर वृत्त असे की, सुवर्ण दिप न्युज मध्ये काही दिवसांपूर्वीच तामसवाडी ता.रावेर येथे घाणीचे साम्राज्य डासांचा सुळसुळाट या मथळ्याखाली बातमी प्रसिद्ध झालेली होती,तेव्हा याबाबत त्वरित दखल घेत येथील ग्रामपंचायत मार्फत रस्त्यांच्या दुतर्फा असलेले झाडे झुडपं कापुन,साचलेला घनकचरा[ads id="ads2"]

 साफसफाई केली,तसेच जागोजागी खड्डयांमध्ये पाणी साचलेले असून ते बुजवून गावामध्ये लवकरात लवकर डासांची पैदास रोखणेकामी औषध फवारणी करण्यात येणार अशी माहीती प्राप्त झाली. सुवर्ण दिप न्युज च्या बातमी मुळे जे.सी.बी.लावून साफसफाई करते वेळी ग्रामपंचायत सदस्य, माजी उपसरपंच, रोजगार सेवक तसेच गावातील काही स्वयंसेवक कार्यकर्ते उपस्थित होते.

जाहिरात

Suvidha Online Raver


 


SuvarDip News Android App
⬆️ येथे क्लिक करून Download करा ⬆️