आदिवासी विकास विभागांच्या आश्रम शाळेतील शिक्षक कर्मचारी व इतर सुरक्षा कर्मचारी यांचा २४ तास शाळेच्या परिसरातच मुक्काम असावा - भारतीय ट्रायबल पार्टी ची मागणी


[ads id='ads1]

राजुर - आदिवासी विकास विभागाच्या आश्रमशाळेत सेवेत असलेल्या शिक्षकांचा शालेय परिसरातच मुक्काम असावा अशी मागणी भारतीय ट्रायबल पार्टी च्या जिल्हा प्रभारी डॉली डगळे यांनी आदिवासी विकास प्रकल्प राजूरचे प्रकल्प अधिकारी राजेंद्र भवारी यांच्याकडे एका निवेदनाच्या माध्यमातून करण्यात आली आहे.


निवेदन पुढिलप्रमाणे - एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय राजूर अंतर्गत येत असलेल्या सर्व आदिवासी मुला मुलींच्या आदिवासी आश्रम शाळेत असलेल्या सर्व शिक्षक कर्मचारी व इतर सुरक्षा कर्मचारी यांना २४ तास शाळेच्या परिसरातच व ज्या गावात दूर्गम भागात शाळा आहे. त्याच गावी मुक्कामी, निवासी राहणे बंधनकारक आहे. अनेक आदिवासी शाळेतील शिक्षक हे शाळेच्या परिसरात व त्याच गावी न राहता इतर शहरी वस्ती असलेल्या गावी आपल्या निवासस्थानी राहतात. त्यामुळे विद्यार्थीवर कुठलेही नियंत्रण राहत नाही. 


तसेच अनेकदा अनुचित प्रकार देखील घडण्याची दाट शक्यता असते.  त्यामुळे येणाऱ्या आदिवासी आश्रम शाळेतील शिक्षकांचा शालेय परिसरातच मुक्काम असावे, यासाठी आदिवासी विकास विभागाच्या सरकारी आदेशाचे तंतोतंत पालन करण्याची मागणी केली आहे अश्या प्रकारेचे निवेदन प्रकल्प कार्यालयास देण्यात आले आहे.

जाहिरात

Suvidha Online Raver


 


SuvarDip News Android App
⬆️ येथे क्लिक करून Download करा ⬆️