जावळी - तालुक्यात एका गावातील 11 वर्षीय अल्पवयीन मुलीवर 65 वर्षांच्या वृद्धाने जवळील शेतात असलेल्या छपरात नेवुन अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. संबंधित वृद्ध आरोपीला मेढा पोलिसांनी अटक केली आहे.
[ads id='ads1]
संशयित आरोपी (बबन) उर्फ बबलिंग जगन्नाथ सपकाळ (वय 65) या आरोपीने पीडित मुलीला हाताने इशारे करत जवळ ये, असे म्हणाल्याने पीडित मुलगी आरोपीकडे गेली त्यानंतर नराधम आरोपी बबन सपकाळ याने पीडित मुलीला "चल" असे म्हणाला असता पीडित मुलीने नकार दिल्याने आरोपीने मुलीच्या डाव्या हाताला धरून जबरदस्तीने जवळील शेतातील छपरात तिला नेले. त्यावेळी पीडित मुली सोबत असलेली मैत्रिण घाबरून तेथून पळून गेली.
तेव्हा आरोपी बबनने पीडित मुलीस छपरात नेऊन तिथं तिच्यावर या नराधम वृद्धाने अत्याचार केला आणि पीडित मुलगी जजोरजोरा आरडाओरड करुन आरोपी बबन तेथून पळून गेला. त्यानंतर पीडित मुलीच्या आजीच्या तक्रारीवरुन नराधम वृध्दाविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, त्याला अटक करण्यात आली आहे.
सदर घटनेमुळे जावळी तालुक्यामध्ये तीव्र संतापाची लाट उसळली असून, संबंधित वृद्धावर कडक कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांतून केली जात आहे. दरम्यान जावळी तालुक्यात गेल्या सहा महिन्यात तीन वेळा अल्पवयीन मुलींवर अत्याचाराच्या घटना घडल्याने मुलींच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. शीतल खराडे यांनी भेट देऊन या प्रकरणाची माहिती घेतली असून, सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल माने हे अधिक तपास करीत आहेत.