३५ वर्षीय विवाहित महिलेच्या घरात जबरदस्तीने घुसून लैंगिक शोषण ; एका तरुणीसह आरोपी तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल


विदर्भ - अमरावती जिल्ह्यातील ही घटना असुन ३५ वर्षीय महिलेच्या घरात जबरदस्तीने घुसून आरोपी निखिल टिकले याने तिच्या इच्छेविरुद्ध लैंगिक शोषण केल्याची धक्कादायक घटना घडली. तो एवढ्यावरच थांबला नाही तर एका १९ वर्षीय युवतीच्या मदतीने तिच्यावर अनैसर्गिक कृत्य करण्यात आल्याची धक्कादायक घटना गाडगेनगर ठाणे हद्दीतील केवल कॉलनीत येथे दि १७ सप्टेंबर रोजी घडली. 
[ads id='ads1]

या संबंधित प्रकरणी शुक्रवारी रात्री उशिरा पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला. या गुन्ह्यात मदत करणाऱ्या एका तरुणीसह आरोपी तरुणाविरुद्ध पोलिसांनी गुन्हा नोंदविला आहे.तर निखिल टिकले (रा.अर्जुननगर) असे आरोपी चे नाव आणि यात एक १९ वर्षीय तरुणी या दोघांनी मिळून हा प्रकार केलाचे उघडकीस झाले. 


सूत्रांच्या माहितीनुसार आधीच्या भांडणातून हा गुन्हा घडला. फिर्यादी ३५ वर्षीय विवाहित महिलेच्या तक्रारीनुसार आरोपी फिर्यादीच्या घरात शिरला त्याने जबरदस्तीने तिचे लैंगिक शोषण केले. या महिलेसोबत आरोपीची ओळख असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. 


पीडित महिलेला संशय होता की, या गुन्ह्यातील युवतीसोबत पीडितेच्या पतीचे काहीतरी संबंध होते. तसेच ती आरोपीच्या संपर्कात होती. तिने या गुन्ह्यात आरोपीला अनैसर्गिक कृत्य करण्यास प्रत्यक्ष मदत केल्याने पोलिसांनी तिलाही आरोपी म्हणून अटक केली असून ,


आरोपीविरुद्ध भादंवि कलम ३७६, ३७७, ४५२, ३५४, ३२३, ५०४, ५०६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय आर जे चंदापुरे करीत आहेत.

जाहिरात


Suvidha Online Raver


 


SuvarDip News Android App
⬆️ येथे क्लिक करून Download करा ⬆️