पाणी पातळीत झपाट्याने वाढ ; गोदावरी नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा


नांदेड - विष्णुपूरी प्रकल्पातून सोडलेल्या विसर्गामुळे पाणी पातळीत झपाट्याने वाढ झाल्याने नदीकाठच्या पैनगंगा, पूर्णा, मांजरा या नदीकाठच्या गावातील सर्व नागरिकांना प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
[ads id='ads1]

विष्णपुरी प्रकल्पाच्या 10 दरव्याजातून 1,37,018 क्युसेक विसर्ग सुरु आहे. निम्न दुधना प्रकल्पातून 30,324 क्युसेक विसर्ग पूर्णा नदीपात्रात सुरु आहे. माजलगाव प्रकल्पातून 80,534 क्युसेक विसर्ग सुरु आहे. पूर्णा प्रकल्पाच्या येलदरी व सिद्धेश्वर पाणलोट क्षेत्रात पूर्णा नदीत 23,300 क्युसेक विसर्ग सुरु आहे. सिद्धेश्वर धरण परिसरात मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने पूर्णा ब्रीज जवळ 71,600 क्युसेक विसर्ग सुरु आहे. 


जुन्या पुलाजवळ पाणी पातळी 351.00 मी. एवढी आहे. इशारा पाणी पातळी 351.00 मी. तर धोका पातळी 354.00 मी. इतकी वाढली आहे. गोदावरी नदीतून विष्णुपूरी बंधाऱ्यात मागील प्रकल्पातून 3,00,000 क्युसेक विसर्ग टप्या टप्याने प्रवाहीत होणार आहे. त्यामुळे जुन्या पुलावरील धोक्याची पाणी पातळी 354.00 मी. ने वाढण्याची शक्यता आहे. इशारा पातळीचा विसर्ग 2,13,000 क्युसेक व धोका पातळीचा विसर्ग 3,09,774 क्युसेक आहे.  

उर्ध्व पैनगंगा धरण 100 टक्के भरल्याने धरणाचे पाणलोट क्षेत्रात पाऊस झाल्याने तेथील 11 दरवाजे उघडून 18,791 क्युसेक पाणी सोडण्यात आले आहे. अशी माहिती नांदेड पाटबंधारे विभागाचे अधीक्षक अभियंता बी.के.शेटे यांनी दिली आहे.

जाहिरात


Suvidha Online Raver


 


SuvarDip News Android App
⬆️ येथे क्लिक करून Download करा ⬆️