...येथील पोलिस लॉकअप आत केवळ बलात्कारातील आरोपी ; अन्य आरोपींना ठेवण्यासाठी जागाच शिल्लक नाही...


[ads id='ads1]

डोंबिवली : काही दिवसांपूर्वी झालेल्या अल्पवयीन मुलीवरील बलात्कार प्रकरणात पोलिस पथकांनी अटक केलेल्या तब्बल 33 आरोपींपैकी दोन अल्पवयीन आरोपी वगळता अन्य 26 आरोपीं हे मानपाडा पोलीस ठाण्याच्या लॉकअप आत ठेवण्यात आले आहे. 


एखाद्या फौजदारी गुन्ह्यात एवढ्या मोठ्या प्रमाणावर आरोपी असल्याची ही महाराष्ट्र राज्यातील पहिलीच घटना आहे. या पोलीस ठाण्यात फक्त चार लॉकअप आहेत आणि एका लॉकअपमध्ये प्रत्येकी सहा - सात आरोपी ठेवल्याने अन्य गुन्ह्यांमधील आरोपींना ठेवण्यासाठी जागाच शिल्लक नाही. 


यामुळे सध्या लॉकअप फुल्ल झाल्याची चर्चा आहे.  सामूहिक बलात्काराच्या तपासकामी मानपाडा पोलीस ठाण्याची संपूर्ण यंत्रणा व्यस्त झाल्याने दुसऱ्या अन्य गुन्ह्यांचा तपास थंडावल्याचीही चर्चा आहे.  सध्या मानपाडा पोलीस ठाण्याच्या चारही लॉकअप आत बलात्कार प्रकरणातील आरोपीच असल्याचीही माहिती समोर आली आहे तर  [ads id=ads2] 

बलात्कार प्रकरणातील अटक आरोपींना ठेवण्यासाठी मानपाड्यातील लॉकअप पुरेसे आहेत का? असा प्रश्न या ठिकाणी उपस्थित झाला आहे तर आरोपींची संख्या पाहता त्यांना शहरातील अन्य पोलीस ठाण्यांमधील लॉकअप आत ठेवले जाईल, याबाबत चर्चा होती. 


मात्र या सर्वांना चौकशीकामी सोयीचे व्हावे यासाठी  येथील चार लॉकअपमध्येच ठेवल्याची ठेवण्यात आले अशी सूत्रांच्या प्राथमिक माहिती आहे तर या आरोपींना घरचे जेवण नाकारण्यात आले आहे आणि तीन दिवसांपासून त्यांना कपडेही बदलायला दिलेले नाहीत, अशी तक्रार आरोपींच्या नातेवाईक करीत आहेत.. 

जाहिरात

Suvidha Online Raver


 


SuvarDip News Android App
⬆️ येथे क्लिक करून Download करा ⬆️