तामसवाडी ता.रावेर प्रतिनिधी (राजेश रायमळे) "पाढरं सोनं" असे बिरूद मिळालेलं आणि कमी पावसात येणारे नगदी पीक म्हणून ओळख असलेले कपाशी या पिकावर यंदा आसमानी संकट ओढवल्यामुळे बळी राजा खुप निराश होऊन मदतीची अपेक्षा व्यक्त करित आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की,तामसवाडी ता.रावेर परिसरात यंदा अतिवृष्टीमुळे ज्वारी,बाजरी,मका आणि खरिपाच्या सर्वच पिकांचे भविष्य धोक्यात असून कपाशी पीकाला याचा खुप मोठा फटका बसलेला आहे.
[ads id='ads1]
.कापूस हे नगदी पीक असून महाराष्ट्र राज्यात मुख्यत्वेकरून विदर्भ,खान्देश,आणि मराठवाडय़ात मोठया प्रमाणावर कपाशी लागवड करण्यात येते.महाराष्ट्रातील कपाशीला चिन आणि बांगलादेशात मोठ्याप्रमाणात मागणी असल्यामुळे जळगांव, धुळे आणि नाशिक च्या काही भागात खुप मोठ्या प्रमाणात या नगदि पिकाची लागवड करण्यात येते.परंतु यंदा कपाशी पिकाला अतिवृष्टीचा मोठ्या प्रमाणावर फटका बसला आहे.सुरूवातीला पावसाने दांडी मारल्याने शेतकर्यांसमोर पेरणी केलेलं पीक जगवायचं कसं हाच प्रश्न निर्माण झाला होता,मात्र स्वतःला सावरत शेतकऱ्यांनी कसेबसे हे पीक जगवले.
परंतु त्यानंतर कपाशी हे पीक काढणीला येण्यापूर्वीच पावसाने जोरदार हजेरी लावली आणि परिसरातील कपाशीवर अतिवृष्टीचे आसमानी संकट ओढवले.सततच्या संततधार पावसामुळे पांढरे सोने पुर्णपणे काळवंडले काढणीला आलेला कापूस अतिपावसामुळे ओला होऊन सडू लागल्यामुळे व्यापाऱ्यांकडून देखील त्याला नापसंतीचीच दाट शाक्यता असल्यामुळे शेतकऱ्यांकडून नाराजीचाच सुर निघत आहे.
[ads id='ads2]
मोठा खर्च करून खुप मेहनतीने घेतलेल्या पिकावर पावसाने पाणी फेरल्यामुळे बळी राजाला मोठ्या आर्थिक संकटाला तोंड द्यावे लागणार असल्याने बळी राजा हवालदिल झाला आहे.कधी काळी कापूस विकून सोने खरेदी करता येत असल्यामुळेच कापसाला" पांढरं सोनं"हे बिरुद मिळालेलं आहे,मात्र यंदा हे पांढरं सोनं मातीमोल होऊन सडूलागल्याने लागलेला खर्च देखील निघणार की,नाही या चिंतेत ग्रस्त शेतकरीवर्ग रडकुंडीला आलेला असून कृषी विभागामार्फत संबंधित नुकसान ग्रस्त शेतकर्यांच्या शेताची पाहणी करून पंचनामे करावेत व नुकसान ग्रस्त शेतकर्यांना दिलासा द्यावा अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.